पनवेल परिसरातून गुटखा जप्त
पनवेल/ संजय कदम :
पनवेल तालुक्यातील टेंभोडे येथील गावामध्ये गुन्हे शाखा मध्यवर्ती कक्षाने धडक कारवाई करत पावणेपाच लाख रुपयांचा गुटख्याचा साठा हस्तगत करून एकाला अटक केली आहे. नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा मध्यवर्ती कक्षाने पनवेलजवळील टेंभोर्डे गावातील एका घरावर छापा मारून विक्रीसाठी साठवून ठेवलेला सुमारे पावणेपाच लाख रुपये किमतीचा गुटखा, पानमसाला व तंबाखूजन्य पदार्थाचा साठा जप्त केला आहे. या प्रकरणी दीपककुमार गुप्ता (32) याला अटक करण्यात आली आहे.
या कारवाईत अटक करण्यात आलेला दीपककुमार हा त्याच्या आवश्यकतेप्रमाणे काही माल त्याच्या ओळखीचा गुटखा पुरवठादार रमेश चौधरी व कळंबोली येथील रोहित गुप्त, कालू ऊर्फ प्रमोदकुमार दास, मुसैब अन्सारी यांच्याकडून मागवून घेत असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे. तसेच या चौघांकडू न घेतलेला माल तो घरामध्ये साठवून नंतर वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या पान टपरी चालकांना विकत असल्याचेदेखील तपासात आढळून आले आहे. त्यानुसार गुन्हे शाखेकडून गुटखा पुरवठादारांचा शोध सुरू केला आहे.
viagra online pharmacy review: online pharmacy reddit – tesco pharmacy doxycycline cost