गणपत वारगडा संपादित 2023 या आदिवासी दिनदर्शिकेचे प्रकाशन कोकण शिक्षक मतदार संघाचे आमदार बाळाराम पाटील यांच्या हस्ते संपन्न
पनवेल/ प्रतिनिधी :
गणपत वारगडा संपादित अकराव्या आदिवासी दिनदर्शिकेचे प्रकाशन कोकण शिक्षक मतदार संघाचे आमदार बाळाराम पाटील यांच्या शुभहस्ते शेतकरी कामगार पक्ष कार्यालयात करण्यात आले.
आमदार बाळाराम पाटील यांनी आदिवासी दिनदर्शिकेचे कौतुक करून समाजासाठी हिताची असल्याचे सांगून या आदिवासी दिनदर्शिकेमध्ये समाजातील क्रांतिकारक आणि समाजातील चालीरीती रूढी परंपरा यांचा उल्लेख केला आहे. तसेच जीवनात एखादं काम करणं शक्य आहे, मात्र सातत्य ठेवणे कठीण असतं. परंतु गणपत वारगडा यांनी गेले दहा वर्ष सातत्याने आदिवासी दिनदर्शिका काढून तो सातत्य टिकवला आहे त्यामुळे पत्रकार गणपत वारगडा यांचे कौतुक करू तेवढे कमीच आहे, असे कोकण शिक्षक मतदार संघाचे आमदार बाळाराम पाटील पाटील यांनी आदिवासी दिनदर्शिकेचे प्रकाशन करताना सांगितले.
यावेळी पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीचे सल्लागार व जेष्ठ पत्रकार सुनील पोतदार, पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीचे अध्यक्ष निलेश सोनवणे, स्टार पनवेल संपादक अनिल राय, रायगड सम्राट संपादक शंकर वायदंडे, आदिवासी सेवा संघाचे सचिव तथा साप्ताहिक आपले रायगडचे संपादक सुनील वारगडा, जागृती फाऊंडेशन चे तळोजा विभागीय अध्यक्ष कल्पेश कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.