आदिवासीचा जीव घेणारा बिपीसीएल प्लॅन्ट बंद करण्याची मागणी
खालापूर/ आदिवासी सम्राट :
संपर्क, 9820254909
—————-
मौजे पराडे तालुका खालापूर जिल्हा रायगड ही आदिवासी समाजाची जवळ जवळ 80 ते 100 घराची वस्ती आहे. आदिम कातकरी या जमातीचे लोक या वाडीत राहता, मात्र अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजेपासून हा समाज वंचित आहे. या वसाहती मधील आदिवासी समाजावर शासकीय आणि गैरशासकीय जुलमाची मालिका अखंड चालू आहे येथील आदिवासी समाज अत्यंत दैनिक अवस्थेत जीवनात जगत आहे. आदिवासी समाजाचे पाच एकराचे गावठान आहे आदिवासी समाजाच्या गावठान ला लागून बिपीसीएल कंपनीने अत्यंत स्फोटक ज्वलनशील गॅसचे मोठमोठे टॅंक उभे केले आहेत भविष्यात या त्यांचा स्फोट होऊन शेकडो आदिवासी बांधव मृत्यूमुखी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. आदिवासी वाढीमध्ये प्राथमिक शाळा असून त्या शाळेत जवळजवळ 88 मुले शिक्षण घेत आहेत या शाळेच्या बाजूला दहा मीटर वर अत्यंत घातक बीपीसीएल कंपनीने टॅंक उभा केला आहे हा ज्वलनशील प्लांटचा धोका लहान मुलांना सुद्धा आहे, ही अत्यंत गंभीर बाब शासनाने लक्षात घेऊन इरशाळवाडीची पुनरावृत्ती होणार नाही याची दखल घ्यावी.
याच खालापूर जिल्हा रायगड मध्ये 19 जुलै 2023 रोजी इरशाळवाडी मध्ये अत्यंत दुःखदायी घटना घडवून 84 लोकं मृत्यू मुखी पडलेल्या आहेत त्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून आदिवासी अधिकार संघर्ष समितीच्या वतीने खालापूरचे तहसीलदार यांना निवेदन सादर करून बीपीसीएल चा प्लांट बंद करण्याची मागणी केलेली आहे. सदरचा जवलानशील प्लांट बंद करावा असे निवेदनात सादर केले आहे, याशिवाय मौजे पराडे तालुका खालापूर येथील आदिवासी वाडीवर आदिवासींच्या गावठाण वर धन दांडगे शेटजीं लाटजींनी अतिक्रमण करून आदिवासी समाजाच्या हक्काची जागा हडप केली आहे सदरचे अतिक्रमण तात्काळ हटविण्यात यावे अन्यथा सात दिवसानंतर आदिवासी समाज स्वतः गावठाण वरील अतिक्रमण हटवतील असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
खालापूर तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार श्री. राठोड यांनी आदिवासी बांधवांची चर्चा करून बाजू ऐकून घेतली व तात्काळ कारवाई करण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले यावेळी अध्यक्ष मालू निरगुडे, सल्लागार बीपी लांडगे, संतोष चाळके तसेच स्थानिक मौजे पराडे येथील बहुसंख्य आदिवासी बांधव उपस्थित होते.