सुधागड पाली सह्याद्री आदिवासी ठाकूर समाज संस्थाच्या वतीने विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा..
आठ जिल्हयात एक तरी आयएएस अधिकारी (IAS Officer) बनावा; गुणगौरव सोहळ्यात विद्यार्थ्यांना केले प्रोत्साहन
सुधागड पाली/ आदिवासी सम्राट :
आदिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात आवड निर्माण व्हावी आणि उच्च पदापर्यंत पोहचावं या उद्देशाने गेल्या १० वर्षापासून सह्याद्री आदिवासी ठाकूर समाज संस्था पुढाकार घेऊन दरवर्षी तालुक्यातील आदिवासी विद्यार्थ्यांचा गुणगौरव व मार्गदर्शन सोहळाचे आयोजन केले जाते.
या वर्षी रविवार, दि. २७ ऑगस्ट २०२३ रोजी या संस्थेच्यावतीने आदिवासी विद्यार्थ्यांचा गुणगौरव व मार्गदर्शन सोहळाचे आयोजन सुधागड पाली येथील आदिवासी ठाकूर समाज भवन येथे कार्यक्रम घेण्यात आला होता. या गुणगौरव व मार्गदर्शन सोहळामध्ये आदिवासी वसतिगृह विद्यार्थी व विद्यार्थींनीचा मोठा सहभाग होता. इयत्ता १०वी, १२वी, पदवी तसेच अन्य शैक्षणिक क्षेत्रात चांगल्याप्रकारे गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक देवून त्यांचा मन सन्मान करण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांनी आता भविष्यात काय केलं पाहिजे? शैक्षणिक प्रगती कशी होईल? शैक्षण घेतल्यानंतर समजाचे काय देणं लागतंय? स्पर्धा परीक्षेला कसे सामोरे जायचं? वसतीगृहातील प्रवेश आणि शिष्यवृत्ती यासंदर्भात देखील अनेक मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शिवाय, धर्मा फाऊंडेशन व जुहू सुपरफिट यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केले.
तसेच प्रमुख मार्गदर्शन म्हणून आदिवासी ठाकूर नोकरदार वर्ग संस्था महाराष्ट्र राज्याचे सचिव कांताराम खंडवी सर, सहाय्यक पोलीस निरीक्षक नवनाथ उघडे, मुंबई महानगरपालिका सहाय्यक अभियंता उत्तम डोके यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. यावेळी जिल्हाध्यक्ष मालू निरगुडे, मा. अध्यक्ष यशवंत हंबीर, महिला तालुका अध्यक्ष सविताताई हंबीर, आदिवासी सेवा संघाचे अध्यक्ष, पञकार गणपत वारगडा, जिल्हा सदस्य पांडुरंग पारधी, माजी सरपंच विष्णू खैर, गोविंद शिद, धनाजी शिद रवी बांगारे, माजी सभापती पिंटू ढुमणा, डाॅ. वाय.के.वारगुडे, मिलींद वारगुडे, भगवान हंबीर, सुधागड पाली तालुक्यातील नवनिर्वाचित अध्यक्ष गोविंद लेंडी, सचिव करूण हंबीर, उपाध्यक्ष चंद्रकांत वारगुडे, गुलाब हिरवे, कार्याध्यक्ष ललित फसाळे, खजिनदार गणपत हंबीर, सहखजिनदार बबन हिरवे, पाली विभागीय अध्यक्ष मंगेश निरगुडे, परळी विभागीय अध्यक्ष प्रकाश ढुमणा आदी. कार्यकर्ते उपस्थित होते.