20240324 170259
अलिबाग उरण कर्जत कोकण खालापूर दिल्ली नेरळ पनवेल महाराष्ट्र रायगड सामाजिक

आदिवासींच्या समस्यांबाबत कार्यकर्त्यांनी भावी खासदार संजोग वाघेरे पाटील यांची घेतली भेट..

Adivasi samrat logo new website

आदिवासींच्या समस्यांबाबत कार्यकर्त्यांनी भावी खासदार संजोग वाघेरे पाटील यांची घेतली भेट..

मावळ/ गणपत वारगडा :
रायगड जिल्हात आदिवासी समाजातील अनेक समस्या दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. त्या समस्यांचे निवारण करण्यासाठी रायगड जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्त्यांनी मावळ लोकसभा मतदार संघातील भावी खासदार मा. संजोग वाघेरे पाटील यांची भेट घेतली.
20240324_170259आदिवासी समाजाला लोकशाही व संविधानाचे महत्व काय आहे याची जाणीव होऊ लागली आहे. त्यासाठी लोकशाही व संविधान टिकणे आवश्यक आहे, अशी चर्चा करत आदिवासींच्या जमिनीवर अतिक्रमण, बेकायदेशीरपणे असणारी खरेदी- विक्री, वन जमिनी तसेच आदिवासींच्या गावठाण या सारखे अनेक विषयाबाबत भेट घेऊन मावळचे भावी खासदार संजोग वाघेरे पाटील यांच्या सोबत चर्चा करण्यात आली.

adivasi logo new 21 ok (1)
यावेळी आदिवासी समाजाचे रायगड जिल्हाध्यक्ष जयवंत शिद, आदिवासी सेवा संघाचे अध्यक्ष, पत्रकार गणपत वारगडा, माजी सरपंच, सामाजिक कार्यकर्ते विष्णूशेठ खैर, सोबत शिवसेना रायगड उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत, जेष्ठ शिवसैनिक पिंगळे आदी. उपस्थित होते.