20210504 224945
ताज्या नवी मुंबई नवीन पनवेल पनवेल रायगड सामाजिक

पोलीस पाटीलांनी दाखवली सहानुभूती; कोरोना झालेल्या पोलीस पाटलाच्या कुटूंबीयांकडे सुपूर्द केली आर्थिक मदत

पोलीस पाटीलांनी दाखवली सहानुभूती; कोरोना झालेल्या पोलीस पाटलाच्या कुटूंबीयांकडे सुपूर्द केली आर्थिक मदत

पनवेल/ संजय कदम :
आपल्या सहकार्‍याला कोरोना झाला असून तो रुग्णालयात उपचार घेत आहे. अशावेळी त्याला उपचाराला मदत तसेच त्याच्या कुटुंबियांना एक आर्थिक हातभार म्हणून पनवेल परिसरातील पोलीस पाटीलांनी एकत्र येवून त्याच्या कुटुंबियांकडे ठराविक रक्कम जमा केली व एक वेगळा आदर्श दिला आहे.
पनवेल तालुक्यातील मौजे- गाढेश्‍वर गावाचे पोलीस पाटील बुधाजी शनिवार चौधरी यांना कोरोनाची लागण झाली असून ते एमजीएम कळंबोली पनवेल येथे उपचार घेत आहेत. त्यांच्या उपचारासाठी आर्थिकदृष्ट्या मदत व्हावी म्हणून पनवेल तालुक्यातील पोलीस पाटलांनी एकत्र येवून एक रक्कम जमा केली व रक्कम ती त्यांचे वडील व त्याच्या पत्नी यांना प्रत्यक्ष हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेऊन जमा केलेली रक्कम सुपूर्द केली.
बुधाजी चौधरी यांच्याशी व्हिडीओ कॉलींग करुन संपर्क केला त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत आहे असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी अध्यक्ष पनवेल तालुका पो.पा संघ मिलिंद पोपेटा,  सचिव पनवेल तालुका पोलीस पाटील संघ कुणाल लोंढे  आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

11 − = 2