Screenshot 20241015 044435 Whatsapp
उरण कर्जत खारघर पनवेल सामाजिक

विधानपरिषदेवर पनवेलचे विक्रांत पाटील यांची निवड

विधानपरिषदेवर पनवेलचे विक्रांत पाटील यांची निवड

राज्यपाल नियुक्त आमदारांमध्ये विक्रांत यांचे नाव

आदिवासी सम्राट :
राज्यपाल नियुक्त 12 आमदारांमध्ये विधानपरिषदेवर भाजपकडून अखेर पनवेलच्या विक्रांत पाटील यांची वर्णी लागली आहे.पाटील हे भाजपचे प्रदेश महासचिव असून ते पनवेलचे माजी उपमहापौर देखील राहिले आहेत.त्यांच्या या नियुक्तीमुळे पनवेलला आणखी एक हक्काचा आमदार मिळणार असल्याचे बोलले जात आहे.
Screenshot 20241015 044435 Whatsappविक्रांत पाटील हे वयाच्या सोळाव्या वर्षापासून समाजकारणात समाजकारण व राजकारणात सक्रिय सहभाग राहिला युवा विद्यार्थी आणि युवांचे असंख्य प्रश्न मनाला कायमच वेदना देत होते. या विषयात काम केले पाहिजे ही भावना सातत्याने हृदयात होती आणि म्हणून बाहेर राहून केवळ बघत राहण्यापेक्षा प्रत्यक्ष या प्रक्रियेत उतरून न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करता येईल का हा विचार मनात आला. यामुळे वयाच्या सोळाव्या वर्षापासून सक्रिय समाजकारण व राजकारणात प्रत्यक्ष सहभाग घेतला.त्यांनी भाजपच्या युवा मोर्चात विद्यार्थी आघाडी,युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष, युवा मोर्चा प्रदेश सचिव , महासचिव आणि नंतर थेट भाजपचे प्रदेश महासचिव म्हणून काम पाहिले. वडिल बाळासाहेब पाटील यांच्या माध्यमातून आणि राजकीय परिपक्वतेच्या जोरावर विक्रांत पाटील यांनी भाजपमध्ये आपले वजन वाढवले. विरोधकांना कामाच्या स्वरूपात उत्तर देवून पक्ष वाढवण्याचा प्रयत्न ते करत आहेत.याच कर्तबगारीवर भाजपचे ज्येष्ठ नेत्यांनी बक्षिस म्हणून आता त्यांना विधानपरिषदेवर घ्यायचे ठरविले आहे.15 ऑक्टोबर रोजी ते आमदारकीची शपथ घेतील असे बोलले जात आहे.त्यांच्या या नियुक्तीने पनवेलमध्ये आनंद व्यक्त केला जात असून आ.प्रशांत ठाकूर यांच्या सोबतीला आणखी एक हक्काचा आमदार पनवेलकरांना लाभणार असल्याचे सांगितले जाते.

Adivasi Logo New 21 Ok (1)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

78 − = 72