Office Openinf 11
नवीन पनवेल पनवेल

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते चिपळे येथे जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन..

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते चिपळे येथे जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन..

पनवेल/ प्रतिनिधी :
जो पर्यंत सर्वांच्या शंकांचे निरासन होत नाही तो पर्यंत नैना प्रकल्पाची वीट देखील ठेऊ देणार नाही याची ग्वाही आमदार प्रशांत ठाकूर यांनी चिपळे येथे जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटनावेळी दिली. तसेच भाजपची भूमिका सर्व सामान्य जनतेमध्ये पोहचवून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महायुतीचे सरकार पुन्हा निवडून देण्यासाठी सर्वांनी सज्ज व्हावे, असे आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केले.

Adivasi Logo New 21 Ok (1)
पनवेल विधानसभा मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रचाराचा झंझावात सुरु आहे. या पार्श्ववभूमीवर तालुक्यातील चिपळे गावात भारतीय जनता पार्टीचे कार्यालय सुरु करण्यात आले आहे.
याचे उदघाटन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते सोमवारी झाले. या कार्यक्रमाचे औचित्य साधून अनेकांनी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला.यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले की, भारतीय जनता पार्टी जनसामान्यांमध्ये मिळून काम करणारी पार्टी आहे. आज सुरु झालेल्या या कार्यालयाच्या माध्यमातून लोकांना आपल्या समस्या सोडवण्यासाठी एक हक्काचे ठिकाण उपलब्ध झाले आहे. त्यामुळे मला खात्री आहे निवडणुकी नंतर देखील संपूर्ण परिसरातील लोकांना सेवा देणारे हे केंद्र बनणार आहे. या कार्यक्रमाचे औचित्य साधून उभाटा गटाचे भोकरपाडा गावातील शाखा प्रमुख गजानन
फुलोरे, अनिकेत फुलोरे, अभिजित फुलोरे तसेच विहिघर मधील रहिवासी तथा वीरार येथील उबाटा गटाचे शाखाप्रमुख विश्वनाथ कांबळे यांनी भाजपमध्ये सामील होत पक्षाची ताकद अधिक मजबूत केली. त्यांचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी स्वागत करून त्यांचा निर्णय सार्थ ठरेल असे काम भाजपच्या माध्यमातून होईल असा विश्वास त्यांना दिला.
यावेळी भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, उपाध्यक्ष संजय पाटील, अनुसूचित जाती मोर्चाचे अध्यक्ष अमित जाधव, सरचिटणीस राजेंद्र पाटील, भूपेंद्र पाटील, विभागीय अध्यक्ष सुनील पाटील, शिवकर ग्रामपंचायतीचे सरपंच अनंत ढवळे, युवा मोर्चा तालुका सरचिटणीस विश्वजीत पाटील, हनुमान फुलोरे, अशोक फुलोरे, रुपेश फुलोरे, गिरीश फुलोरे, बूथ अध्यक्ष भास्कर फुलोरे, कल्पेश फुलोरे, किशोर फुलोरे, गणेश फुलोरे, राजेश फुलोरे, हरिदास फुलोरे, गणेश फुलोरे, धीरज फुलोरे, अमोल फुलोरे, लहू फुलोरे, रमेश फुलोरे, दत्ता फुलोरे, माजी सरपंच रमेश पाटील, माजी सदस्य गणेश म्हसकर, माजी उपसरपंच धनंजय पाटील, रोशन पाटील, महेश शाह, नागेश म्हसकर, ह.भ.प. धनाजी परशुराम म्हसकर, आकाश पाटील, कुलदीप पाडवी, विवेक पांडेय, रोहित पाटील, चंद्रकांत राणे, अनुराग पांड्या, सुनील फडके, समाधान फडके, रुपेश फडके, कान्हा फडके, अनंता फडके, मंगेश फडके, दीपक फडके, समीर पाटील, दुशांत पवार, सुनील पाटील, भरत पाटील, नामदेव पाटील, साईनाथ पाटील, दिनकर पाटील, सागर पाटील, संदेश फडके, भावेश फडके, अभिनय पाटील, नितीन पाटील, अक्षय पाटील, स्वप्नील फडके, समीर पाटील, विजय पाटील, विशाल पाटील, तुकाराम पाटील, तन्मय पाटील, सुभाष पाटील, शरद म्हस्कर, सचीन पाटील, प्रतिप पाटील, प्रतीक फडके, प्रनिल फडके, प्रसाद पाटील, निलेश पाटील, नारायण पाटील, महेंद्र पाटील, किरण पाटील, सैरभ पाटील, योगेश पाटील, दिनकर पाटील, धीरज म्हात्रे, अविनाश म्हात्रे, संजय पाटील, रोहीत पाटील, विठ्ठल पाटील हौशिराम फडके, हरीश्चंद्र पाटील, हरीष पाटील, अजीत म्हात्रे, विष्णू पाटील, रवी पाटील, नरेश पाटील, यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

66 + = 74