पारधी समाजाची जीवन ; एक व्यथा..
अंधाराच्या या समाजाला होतो, अजूनही अन्याय
भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाले आहे आणि आपण सर्वांनी अमृत महोत्सव म्हणून साजरा केला पण अजूनही एक खंत आहे खरंच आपला भारत स्वातंत्र्य झाला आहे का? भारताची संस्कृती जपणारा आपला आदिवासी समाज अशी आपली ओळख आहे आदिवासीची निसर्गाशी असलेले नाळ व निसर्गाशी एकरूप असलेली संस्कृती हे एक त्याचे उत्तम उदाहरण आहे. आमच्या आदिवासींमध्ये अनेक समाज आहेत त्यापैकी एक समाज म्हणजे आदिवासी पारधी समाज!
अजूनही जंगलामध्ये भटकंती करून आपले एक वेळेचे जेवणासाठी धडपड, गावोगावी जाऊन भिक्षा मागून खाणे, अन्न वस्त्र व निवारा या प्राथमिक गरजांपासून पूर्णपणे वंचित आणि शिक्षण म्हणजे अमृत असे असले तरी शिक्षणापासून खूप लांब प्रवाहाला राहिलेला माझा हा आदिवासी पारधी समाज एखाद्या गावामध्ये चोरी झाल्यानंतर सैरावैरा पळणे कोणत्याही गुन्हा न करता पूर्णपणे गुन्हेगारी या दृष्टिकोनाने आमच्या समाजाकडे पाहिले जाते जर गावांमध्ये राहण्यासाठी घर नसेल थोडक्यात सांगायचं झाले तर स्थायिक नसेल तर शिक्षण कसे मिळणार हाच प्रश्न नेहमी तयार होतो.
एवढेच नव्हे तर कागदपत्रे सुद्धा कसे मिळणार शासनाच्या वेगवेगळ्या योजना कसे मिळणार हाच मला नेहमी प्रश्न पडतो याचा उपाय म्हणून शासनाने वेगवेगळे योजना आणून समाजास कागदपत्रे काढून द्यावेत त्याचप्रमाणे अन्न वस्त्र व निवारा असे प्राथमिक स्रोत आमच्या समाजापर्यंत कसे पोहोचतील हे महत्त्वाचे आहे गावोगावी माझा हा समाज स्थायिक झाला तर त्यांना शिक्षणाचा योग्य लाभ मिळेल व समाज योग्य प्रवाहात येईल तेवढेच नव्हे तर गुन्हेगारीचा शिक्का कुठेतरी नाहीसा होईल आम्हाला शिक्षण मिळाले तर सामाजिक आर्थिक आणि मानसिक परिस्थितीतून समाज सुधारेल.
त्याचप्रमाणे अंधश्रध्देला अळा बसेल व नवीन पिढीला त्यांचे भविष्य अंधारात न राहता जगण्याचा मार्ग मिळेल. अजूनही काही गावागावांमध्ये मुलींना, स्रीयांना त्यांचे अधिकार मिळत नाही ते मिळतील. शिक्षण मिळाले तर न्याय, हक्क व संविधानाने दिलेले अधिकार आमच्या समाजापर्यंत पोहचेल व समाजास खऱ्या अर्थाने न्याय मिळेल हे नक्की. खऱ्या अर्थाने आपला भारत स्वातंत्र्य झाला असे म्हणता येईल
#लेखक : प्रा प्रशांत चव्हाण
(एम एस सी .बी एड. )