Img 20250805 Wa0037
संपादकीय

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ‘रायगड जिल्हास्तरीय भजन स्पर्धा’ 

Adivasi Samrat Logo New Websiteलोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ‘रायगड जिल्हास्तरीय भजन स्पर्धा’ 

अनेक मान्यवरांची लाभणार उपस्थिती; सर्वोत्कृष्ट भजनी मंडळाला ५१ हजार रुपये बक्षिस

पनवेल/ आदिवासी सम्राट : गोरगरिबांचे आधारस्तंभ, थोर दानशूर व्यक्तिमत्व, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने पनवेल शहरातील मार्केट यार्ड मधील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या रायगड जिल्हास्तरीय भजन स्पर्धेचे उदघाटन शनिवार दिनांक २३ ऑगस्ट रोजी सकाळी ९. ३० वाजता माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते होणार आहे.

    Adivasi Logo New 21 Ok (1)यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी नगराध्यक्ष जे.एम. म्हात्रे, प्रदेश सदस्य बाळासाहेब पाटील, उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत, ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख, पनवेल महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, माजी शहर अध्यक्ष अनिल भगत, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, पंडित शंकरराव वैरागकर, बंडाराज घाडगे, नंदकुमार पाटील, ह. भ. प. निवृत्तीबुवा चौधरी, शंकुनाथबुवा पडघेकर, महादेवबुवा शहाबाजकर, सारेगम फेम जितेंद्र तुपे, इंडियन आयडॉल विजेता सागर म्हात्रे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.

     हि स्पर्धा ‘पुरुष खुला गट’ आणि ‘महिला खुला गट’ अशा दोन गटात होणार आहे. स्पर्धेतील प्रथम पारितोषिक ५१ हजार रुपये, द्वितीय क्रमांक २५ हजार रुपये, तृतीय क्रमांकास १५ हजार रुपये, उत्तेजनार्थ पारितोषिक ७ हजार रुपये, तसेच उत्कृष्ट पखवाज वादक व उत्कृष्ट तबला वादक यांना प्रत्येकी ७ हजार रुपये आणि सर्व विजेत्यांना सन्मानचिन्ह असे आहे. शनिवार आणि रविवार असे दोन दिवस आयोजित या स्पर्धेचा समारोप व पारितोषिक वितरण सोहळा दिनांक २४ ऑगस्टला सायंकाळी ०६. ३० वाजता होणार आहे. या स्पर्धेचा भजनप्रेमी रसिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री रामशेठ ठाकूर विकास मंडळाचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, उरण विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश बालदी, श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे सचिव परेश ठाकूर व आयोजन समितीने केले आहे.Adivasi Calender 2025 Png