Screenshot 20250501 093956 Whatsapp
संपादकीय

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते मालडुंगे ग्रामपंचायत येथे केले रुग्णवाहिकेचे लोकार्पण..

Adivasi Samrat Logo New Website

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते मालडुंगे ग्रामपंचायत येथे केले रुग्णवाहिकेचे लोकार्पण..

पनवेल/ प्रतिनिधी :
श्रीकृष्ण शरण शैक्षणिक व सामाजिक ट्रस्ट यांच्या माध्यमातून मालडुंगे ग्रामपंचायत रुग्णवाहिका भेट देऊन नागरिकांच्या मुख्य अडचणी दूर करण्यासाठी मोलाचे सहकार्य केले आहे. मालडुंगे ग्रामपंचायत सरपंच सिताराम चौधरी, उपसरपंच जनार्दन निरगुडा, ग्रामसेवक व ग्रामपंचायत सदस्य यांच्या वतीने हे आयोजन करण्यात आले होते. गावातील ग्रामस्थांना अडचणी म्हणजे आयत्यावेळी अचानक मोठ्या रुग्णालयात जाण्यासाठी रुग्णवाहिकेची गरज भासते. ही बाब मालडुंगे ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच व सदस्यांनी क्षीरसागर यांच्या कानावर घातली असताना त्यांनी ग्रामपंचायत मालडुंगे साठी रुग्णवाहिका भेट म्हणून देण्याचे आश्वासन दिले होते.
Img 20250501 Wa0025सदर रुग्णवाहिकेचे लोकार्पण आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. नागरिकाचे काम होणे महत्त्वाचे आहे, असेही त्यांनी उपस्थितांना सांगितले. यावेळी श्री कृष्ण शरण शैक्षणिक व सामाजिक ट्रस्टच्या छबीकृष्ण क्षीरसागर, अद्वैत क्षीरसागर, राजश्री क्षीरसागर, रागिनी सिन्हा, मयूर गांगुर्डे, भाजपाचे युवा नेते राजेश भोईर, पंचायत समितीचे माजी सदस्य राज संजय पाटील, सरपंच सिताराम चौधरी, उपसरपंच जनार्दन निरगुडा, ग्रामपंचायात अधिकारी हेमंत राठोड, ग्रामपंचायत सदस्य उषाताई वारगडा, अर्जुन कांबडी, ताई भस्मा, माई खंडवी, पत्रकार गणपत वारगडा, पद्माकर चौधरी, पत्रकार सुनील वारगडा, माजी सरपंच जोमा निरगुडा, माजी उपसरपंच काळुराम वाघ, संजय जाधव, सोमनाथ चौधरी, राम भस्मा, राजाराम चौधरी, राजा निरगुडा, अविनाश वाघ, अशोक वाघ, नाना कांबडी आदि. उपस्थित होते.
Img 20250501 Wa0014
पनवेल तालुक्यातील मालडुंगे हे गाव शेवटचे आहे. तरी हे गाव पूर्वेकडून पनवेल मधील पहिले गाव आहे. नागरिकांची आरोग्याची समस्या दूर व्हावी आणि या परिसरातील शिक्षणाची व्यवस्था व्हावी. हे प्रश्न सोडवण्यासाठी केवळ शासनावर अवलंबून चालणार नाहीत तर स्वयंसेवी संस्था पुढे आल्या तर गरजा लवकर भागतात. ज्या येणाऱ्या संस्था पुढे येतात, त्यावेळी निश्चित आनंद होतो. आणि अनेक लोकांना अडचणीच्या आणि तातडीच्या प्रसंगामध्ये त्याचा जीव वाचवण्यासाठी या रुग्णवाहिकेची मदत होईल.
– आमदार प्रशांत ठाकूर

Img 20250501 Wa0015