आमदार प्रशांत ठाकूर चषक : वक्तृत्व स्पर्धा २०२५ महाअंतिम फेरी उत्साहात संपन्न!
वक्तृत्व स्पर्धेत १६,८०० पेक्षा जास्त स्पर्धक लाभणे हा मोठा रेकॅार्डच असेल -नितीन पाटील
पनवेल/ आदिवासी सम्राट : कोशिश फाऊंडेशन व पनवेल महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “आमदार प्रशांत ठाकूर चषक : वक्तृत्व स्पर्धा २०२५” या उपक्रमाची महाअंतिम फेरी दिनांक २५ ऑगस्ट २०२५ रोजी यशस्वीपणे संपन्न झाली. या उपक्रमात पनवेल क्षेत्रातून तब्बल १६,८८७ स्पर्धकांमधून निवडलेले ७१३ विद्यार्थी सहभागी झाले होते.
सी. के. ठाकूर कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स खांदा कॉलनी आणि लोकनेते दि. बा. पाटील विद्यालय पनवेल या ठिकाणी महा अंतिम फेरी पार पडली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे माजी शहराध्यक्ष अनिल भगत, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, माजी नगरसेवक अजय बहिरा, महानगरपालिकेचे शिक्षण अधिकारी रमेश चव्हाण, नविन पनवेल अध्यक्ष दशरथ म्हात्रे, ऍड. चेतन जाधव, जिल्हा उपाध्यक्ष मयुरेश नेतकर, अभिषेक पटवर्धन, ऍड. चिन्मय समेळ, नितेश पाटील, अक्षय सिंग आदी उपस्थित होते.विद्यार्थ्यांनी उत्साहाने अनेक सामाजिक व बौद्धिक विषयांवर आपली मतं मांडली. त्यामध्ये माझा आवडता सुपरहीरो, जर मी पक्षी असतो, माझा आवडता विज्ञाननायक, स्वच्छ भारत प्लास्टिक मुक्त भारत, इंटरनेट – वरदान की शाप?, कृत्रिम बुद्धिमत्ता – धोका की वरदान? वेळेचे महत्त्व, अपयश हे यशाचे पायरी आहे हे विचारांना आकार देणारे विषय होते. स्पर्धकांच्या भाषणांमधून विद्यार्थ्यांची सृजनशीलता, संवेदनशीलता आणि वक्तृत्वकौशल्य ठळकपणे दिसून आले. या महाअंतिम फेरीत पनवेल व आसपासच्या नामांकित शाळांचा भव्य सहभाग होता. त्यामध्ये लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल कामोठे, सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर शाळा उलवे, लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मिडियम स्कूल कामोठे, सुधागड एज्युकेशन सोसायटी कळंबोली, सुषमा पाटील विद्यालय कामोठे, सी. के. ठाकूर विद्यालय नवीन पनवेल, पनवेल महानगरपालिका शाळा, जिल्हा परिषद शाळा पनवेल तालुका व ग्रामीण भागतसेच इतर अनेक शाळांचा समावेश होता. महाअंतिम फेरीत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना चषक व प्रमाणपत्रे प्रदान करण्यात येणार आहे.