20211109 142907
संपादकीय

अ‍ॅसिड फेकणार्‍या पतीला ११ तारखेपर्यंत पोलीस कोठडी

अ‍ॅसिड फेकणार्‍या पतीला ११ तारखेपर्यंत पोलीस कोठडी


पनवेल/ प्रतिनिधी :
पत्नीच्या चेहर्‍यावर अ‍ॅसिड फेकून पसार झालेल्या पतीला पनवेल शहर पोलिसांनी त्याच्या झायलो गाडीसह ताब्यात घेतले असून त्याला पनवेल येथील न्यायालयात हजर केले असता 11 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. सेक्टर नं. 2, करंजाडे येथे राहणार्‍या 36 वर्षीय महिला कौटुंबिक वादामुळे पतीचेपासून विभक्त राहते, 15 दिवसांपुर्वी त्यांच्या पतीने त्यांचे व्हट्सअँप स्टेटसवर पत्नीचे आक्षेपार्ह फोटो ठेवल्याने त्यांचे विरूध्द पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. या तक्रारीचा राग मनात धरून पती पवन पाटील (39 रा.बोर्ले) याने तिच्या राहते घरी येवून अंगावर धावून गेले आणि हातातील प्लॅस्टीक बाटलीमधील कोणतेतरी द्रवरूप अँसिड पत्नीच्या चेहर्यावर फेकून तो तेथून पसार झाला होता.


याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करताच वपोनि अजयकुमार लांडगे, पो.नि.गुन्हे संजय जोशी यांच्या सुचनेनुसार गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक फरताडे यांच्यासह पो.हवा.राऊत, पो.शि.घरत, पो.ना.झिणे, पो.शि.मिसाळ आदींच्या पथकाने त्याच्या चालू मोबाईलच्याद्वारे तांत्रिक तपासाचा आधार घेवून तसेच गुप्त बातमीदाराच्या आधारे सदर इसम हा पळस्पे या भागात त्याच्याकडे असलेल्या झायलो गाडीसह येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सापळा रचून त्याला ताब्यात घेतले आहे. याबाबत अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक देवळे करीत आहेत. या संदर्भात त्यांनी सदर आरोपीला पनवेल न्यायालयात हजर केले असता मा.न्यायालयाने 11 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

3 + 5 =