Img 20191102 Wa0043
उरण ताज्या पनवेल रायगड सामाजिक

एसटी व एनएमएमटी बस स्टॉप सुरू करा ! महापालिका विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांची मागणी

एसटी व एनएमएमटी बस स्टॉप सुरू करा !

  • विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांची मागणी

पनवेल/ प्रतिनिधी : 
पनवेल शहरातील उरण नाका येथील बसथांबा बंद असल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. उन्हा – पावसात नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्यामुळे जुना बस थांबा पुन्हा कार्यान्वित करण्याची मागणी विरोधीपक्ष नेते प्रितम म्हात्रे यांच्याकडून पालिकेकड़े करण्यात आली आहे.
पनवेल शहरातून उरणच्या दिशेने जाण्यासाठी अनेक खासगी वाहने, एसटी बस उरण नाकामार्गे जातात. एसटी आगारात न जाता पनवेलमध्ये खरेदीसाठी आलेले अनेक नागरिक उरण नाका, मार्केटयार्ड परिसरातून एसटीचा प्रवास सुरू करतात. पंचरत्न चौक आणि उरण नाका या दोन ठिकाणी एसटीचे थांबे आहेत. या दोन्ही ठिकाणी ठिकाणी बसथांब्याचे शेड नसल्यामुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय होते. मार्केटयार्डजवळ पूर्वीचा बसथांबा आहे. शेडदेखील आहे. हा बसथांबा वापरात नसल्यामुळे शेडची जागा गर्दुल्ले, भिकाऱ्यांनी बळकावली आहे. पावसाळ्यात गर्दुल्ले बसथांब्याचा आसरा घेतात. या ठिकाणी बस थांबत नसल्यामुळे नागरिक दोन्ही चौकांत बसची वाट पाहत उभे असतात. पावसाळ्यात, उन्हाळ्यात गैरसोय होत असतानादेखील नागरिक जीव मुठीत घेऊन बस, खासगी गाड्यांची वाट पाहत असतात. नागरिकांच्या प्रवासाचा विचार करून हा थांबा पुन्हा जुन्या जागी सुरू होण्यासाठी महापालिकेने प्रयत्न करावेत, अशी मागणी विरोधीपक्ष नेते प्रितम म्हात्रे यांनी केली आहे.
महापालिकेच्या माध्यमातून बसथांब्याचे नूतनीकरण केल्यास एसटी आगाराकडे पाठपुरावा करून येथे बसथांबा पुन्हा सुरू करता येईल, अशी मागणी विरोधीपक्ष नेते प्रितम म्हात्रे यांनी महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांच्याकडे केली. काही पावले पुढे जाऊन बस पकडावी लागेल, मात्र नागरिकांचा प्रवास सोयीचा आणि सुरक्षित होईल. म्हणून महापालिकेने या जुन्या थांब्याचे नूतनीकरण करावे, अशी मागणी पनवेल महापालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यानी केली.