Img 20210716 Wa0045
अलिबाग ठाणे नवी मुंबई पनवेल महाराष्ट्र रत्नागिरी रायगड सामाजिक

खावटी अनुदान योजनेंतर्गत जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या हस्ते आदिवासी कुटुंबांना खावटी अनुदान वाटप संपन्न

खावटी अनुदान योजनेंतर्गत जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या हस्ते आदिवासी कुटुंबांना खावटी अनुदान वाटप संपन्न

एकूण लाभार्थी संख्या 48 हजार 565 तर जिल्ह्यासाठी एकूण प्राप्त किट 40 हजार 323

अलिबाग/ प्रतिनिधी :
करोना महामारीमुळे अनेकांसमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिलेले आहे. या परिस्थितीत डोंगर दऱ्याखोऱ्यात राहणारा आदिवासी समाज रोजगारापासून वंचित राहिला आहे. त्यामुळे शासनाकडून या आदिवासी बांधवांसाठी खावटी अनुदान वाटप योजना विशेष योजना म्हणून सन 2020-21 या वर्षात मंजूर केली आहे.
खावटी योजनेंतर्गत अनुसूचित जमातीच्या कुटुंबियांना रु.4 हजार प्रति कुटुंब अनुदान ज्यामध्ये रुपये 2 हजार किंमतीचे वस्तू स्वरुपात वाटप व रुपये 2 हजार इतकी रक्कम त्यांच्या बँक / डाक खात्यामध्ये वितरित करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. या पार्श्वभूमीवर आज दत्ताजीराव खानविलकर एज्युकेशनल ट्रस्ट (डी.के.ई. टी) या संस्थेचे चिंतामणराव केळकर विद्यालय,अलिबाग येथे आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी श्रीम.निधी चौधरी यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात अलिबाग, मुरुड व रोहा तालुक्यातील प्रत्येकी दहा आदिवासी कुटुंबांना खावटी अनुदान वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी आदिवासी बांधवांनी विविध शासकीय योजनांचा लाभ घ्यावा तसेच लसीकरण करुन घेण्यासाठी पुढे यावे, असे आवाहनही केले.

रायगड जिल्ह्यात या योजनेंतर्गत एकूण लाभार्थी संख्या 48 हजार 565 असून रुपये 2 हजार लाभ मिळालेल्या लाभार्थीची संख्या 39 हजार 931 आहे तर जिल्ह्यासाठी एकूण 40 हजार 323 किट प्राप्त झाले आहेत, अशी माहिती एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी श्रीम. शशिकला अहिरराव यांनी दिली आहे.
यावेळी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी श्रीम. शशिकला अहिरराव, जिल्हा पुरवठा अधिकारी मधुकर बोडके, श्री. कृष्णा लक्ष्मण म्हात्रे, श्री.मनमित पाटील, कातकरी संघटना अलिबाग अध्यक्ष श्री. भगवान नाईक, गौरव पाटील, उप प्रादेशिक व्यवस्थापक, आदिवासी विकास महामंडळ, जव्हार श्री. राजेश पवार, सहायक प्रकल्प अधिकारी श्री. कैलास खेडकर, कार्यालय अधीक्षक आनंद पाटील, इतर अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

+ 25 = 27