ठाणे ताज्या मुरबाड सामाजिक

समाजात धडपडणा-या कार्यकर्त्यांला रस्त्याच्या भूमिपूजनाचा मिळाला मान

समाजात धडपडणा-या कार्यकर्त्यांला रस्त्याच्या भूमिपूजनाचा मिळाला मान

  • हनुमान पोकळा यांच्या हस्ते बिरवाडी रस्त्याचे झाले भूमिपूजन

मुरबाड/ प्रतिनिधी :
ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुका येथील बिरवाडी आदिवासी गावात रस्ता मंजूर करण्यात आला. सदरचा रस्ता हा आमदार निधीतून मंजूर झाले असल्याचे येथील ग्रामस्थांकडून सांगितले जाते. विशेष म्हणजे गावाकडे कोणतेही विकास कामे मंजूर झाली की गावातील पुढारी कोणत्या तरी राजकीय पुढा-यांच्या हस्ते भूमिपूजन करून घेत असतात आणि राजकीय पुढारी देखील भूमिपूजन करण्यासाठी नेहमी पुढे पुढे येतात.

माञ, मुरबाड तालुक्यातील बिरवाडी या आदिवासी गावाचा रस्ता रस्त्याचे भूमिपूजन करण्यासाठी ग्रामस्थांनी कोणत्या राजकीय पुढा-यांना न बोलवता चक्क त्या भागातील एक समाजात धडपडणारा हनुमान पोकळा या कार्यकर्त्यांला बोलवून त्यांचे हस्ते बिरवाडी रस्त्याचे भूमिपूजन केले. त्यामुळे असे समाजात धडपडणा-या कार्यकर्त्यांच्या हस्ते भूमिपूजनचा मान गावातील लोकांनी दिल्याने ख-या अर्थाने समाजात आता जनजागृती होत असल्याचे चिञ दिसत आहेत.

यावेळी हनुमान पोकळा यांना आनंद होवून समाजाचा अभिमान वाटू लागला. तसेच सगळीकडे असाच मान सन्मान समाजाने प्रत्येक कार्यकर्त्यांला देण्यात यावेत असाही सल्ला हनुमान पोकळा यांनी उपस्थितांना दिला. याप्रसंगी बिरवाडी गावातील सामाजिक कार्यकर्ते जगदीश निरगुडा, श्याम निरगुडा, पिंटू खंडवी, दिलीप बांगारा, लक्ष्मण निरगुडा, तानाजी गिरा तर महिला कार्यकर्त्यां माया हनुमान पोकळा आदी. ग्रामस्थ उपस्थित होते.

Avatar
गणपत वारगडा
संपादक: आदिवासी सम्राट
https://adivasisamratnews.com

0 thoughts on “समाजात धडपडणा-या कार्यकर्त्यांला रस्त्याच्या भूमिपूजनाचा मिळाला मान

  1. अतिशय सुंदर काम व बातमी देणाऱ्याचे आभार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *