लोकशक्ती सामाजिक संस्थेतर्फे विविध क्षेत्रातील 55 जणांना करण्यात येणार लोकशक्ती कोविड योध्दा या मानाच्या आणि प्रतिष्ठेच्या पुरस्काराने सन्मानित
पनवेल/ प्रतिनिधी :
कोरोना विषाणूच्या जागतिक महामारीमध्ये संपूर्ण जगामध्ये प्रचंड भितीचे वातावरण निर्माण झालेले आहे. मानव जातीमध्ये जीवन आणि मरणाचा संघर्ष सातत्याने सुरू असल्याचा पाहायला मिळतो आहे.जागतिक गतीला अचानक लागलेल्या या ब्रेकमुळे संपूर्ण जगातील सर्व देशांची आर्थिक गणित पार कोलमडून पडली आहेत.आर्थिक दृष्ट्या सुब्रता आणि विकसित व विकसनशील देशांची अवस्था फ़ार बिकट झालेली आहे. जगातील प्रत्येक नागरिक सध्या भयावह जीवन जगताना दिसतोय, एकीकडे आर्थिक कुचंबना तर दुसरीकडे कोरोनाची भिती अशा दुहेरी संकटात आपण सर्वच जण अडकलेलो आहोत, प्रत्येकाच्या मनात बऱ्याच अंशी निराशा आलेली असताना अशा नाजूक वेळी एक मदतीचा सहकार्याचा हात प्रचंड उभारी घेण्यास कारणीभूत ठरू शकतो. मदत रोखीने साहित्यरूपी, शब्द रूपी किंवा मार्गदशक रूपाने असू शकतो. कधी कधी मानसिक आधार सुध्दा खूप मोलाचा ठरतो. अशा या जागतिक संकटात समाजातील निर्लोभ, निस्पृह, निस्वार्थी, निरंकार सामाजिक कार्यकर्ते, राजकिय नेते, राज्य शासनाच्या प्रशासनातील वरीष्ठ प्रशासकीय अधिकारी यांनी अतिशय उत्तम, उत्कृष्ट आणि कौतुक करण्याजोगे काम निश्चित रूपाने केले आहे . अशा मान्यवरांचा उचित मान सन्मान करणे, शाबासकी देणे, प्रोत्साहन देणे, आणि समाजाच्या वतीने अशा रत्नांची कृतज्ञता व्यक्त करणे, संस्था आपले नैतिक कर्तव्य समजते आहे.आणि अशा कठीण परिस्थितीत स्वत : च्या जीवाची पर्वा न करता किंवा फ़क्त स्वत:च्या कुटुंबाचा विचार न करता समस्त मानव जातीसाठी काम केलेल्या मान्यवरांना संस्थेच्या वतीने ” लोकशक्ती कोविड योध्दा या मानाच्या आणि प्रतिष्ठेच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
लोकशक्ती कोविड योध्दा “पुरस्कार प्राप्त मान्यवरांमध्ये मा.ना.कु.आदितीताई तटकरे, पालकमंत्री रायगड, मा.लोकनेते श्री रामशेठ ठाकूर माजी खासदार रायगड, मा.श्री. संजय कुमार, आयपीएस, पोलिस आयुक्त, नवी मुंबई, मा.श्री.विश्वास नांगरे पाटील, आयपीएस.पोलिस आयुक्त, नाशिक, मा.श्री.तुकाराम मुंढे, आयएएस, आयुक्त , नागपूर महानगरपालिका, मा.डॉ.श्री.तात्याराव लहाने.संचालक , आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन, मा.श्री.लोकेशचंद्र , आयएएस , व्यवस्थापकिय संचालक , सिडको, मा . श्री.अण्णासाहेब मिसाळ , आयएएस , आयुक्त , नवी मुंबई महानगरपालिका, मा.श्रीमती. निधी चौधरी, आयएएस , जिल्हाधिकारी रायगड, मा.श्री.शहाजी उमाप , आयपीएस.पोलिस उपायुक्त , मुंबई पोलीस दल, मा.श्री . अशोक दुधे, आयपीएस, पोलीस उपायुक्त, नवी मुंबई, मा.श्री.अनिल पारस्कर , आयपीएस , पोलीस अधीक्षक , रायगड, मा . श्री . सुधाकर देशमुख , आयएएस , आयुक्त पनवेल महानगरपालिका, मा.श्री.माणिक जगताप , माजी आमदार महाड , मा.डॉ. सुधीर कदम , संचालक एम.जी.एम हॉस्पीटल, मा.श्री.फ़िरोज मुल्ला, जिल्हा कोषागार अधिकारी रायगड, मा.श्री.रविंद्र गिड्डे , सहाय्यक पोलीस आयुक्त , पनवेल विभाग, मा.श्री.दिपक पाटील , अधीक्षक अभियंता , मराविम, मा.डॉ.सुधाकर मोरे , जिल्हा आरोग्य अधिकारी , रायगड, मा . श्री. समिर लेंगरेकर , उपायुक्त पनवेल महानगरपालिका , मा . श्री दत्तू नवले , उपविभागीय अधिकारी , पनवेल, मा.श्री.यशवंत माने , उपविभागीय अधिकारी , रोहा , मा. श्रीमती प्रशाली दिघावकर, उपविभागीय अधिकारी, माणगांव, मा.श्री.विठ्ठल ईनामदार उपविभागीय अधिकारी , महाड , मा.श्रीमती , वैशाली परदेशी , उपविभागीय अधिकारी , कर्जत . मा.श्रीमती शारदा पोवार, उपविभागीय अधिकारी , अलिबाग, मा . श्रीमती प्रतिभा पुदलवाड , उपविभागीय अधिकारी , पेण , मा.श्री.अमित शेडगे, उपविभागीय अधिकारी , श्रीवर्धन , मा.श्री.शिवाजी यशवंत मुळीक , पोलीस उपअधिक्षक, सावंतवाडी उपविभाग, मा.श्री. अजयकुमार लांडगे, वरीष्ठ पोलीस निरिक्षक पनवेल शहर, मा.श्री . अशोक राजपूत , वरीष्ठ पोलीस निरिक्षक पनवेल तालुका, मा.श्री.क्रांतिकुमार पाटिल वरिष्ठ पोलीस निरीक्षक , वानवडी , पुणे, मा.श्री . किशोर शिंदे, पोलीस निरीक्षक, रत्नागिरी, मा.श्रीमती चित्रलेखा पाटील , प्रमुख कार्यवाह , पी.एन.पी, मा.श्री.शिवाजी सानप , जिल्हा माहिती अधिकारी , रायगड, मा.श्री. अमित सानप, तहसिलदार, पनवेल, मा.श्री. गणेश किसनराव शेटे, मुख्याधिकारी खोपोली नगरपरिषद, मा.सौ. अर्चना दिवे , मुख्याधिकारी पेण नगरपरिषद , मा.डॉ.प्रितम म्हात्रे , विरोधीपक्ष नेता , पनवेल महानगरपालिका, मा.श्री. रविशेठ पाटील , अध्यक्ष , श्री साई संस्थान , वहाळ , .मा.डॉ. नागनाथ एमपल्ले, उपजिल्हा कोविड रूग्णालय पनवेल, मा.डॉ.सचिन सकपाळ , कोविड रूग्णालय , पनवेल , मा.डॉ.आशिष गांधी , पनवेल , मा.श्री.जयदिप नानोटे , उपकार्यकारी अभियंता.मराविम, मा.डॉ.रोहित बोरकर , पुणे, मा.डॉ. संदिप प्रभुगावकर, गोवा, मा.डॉ.राजन पाटील , नाशिक , मा.प्रा.डॉ.महेशकुमार नारायण मोटे उस्मानाबाद , मा.श्रीमती पुजा वालावलकर नाईक समाजसेविका मुंबई, मा.डॉ.अभिमन्युटकले, मुंबई, मा.श्री.सचिन ज्ञानेश्वर बैरागी , नाशिक , मा.श्री.निलेश दत्तात्रय पर्वत युवा व्याख्याते.रासेयो स्वयंसेवक. अहमदनगर, मा.श्रीमती.निता सचिन गायकवाड, राष्ट्रीय सर्व श्रमिक संघ मावळ तालुका अध्यक्षा. मा.श्री. सुभाष शिवाजीराव घुले उपसरव्यवस्थापक महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ कोल्हापुर विभाग, मा.डॉ.प्रदीप महिंद्रकर, संचालक, मायक्रॉन लॅब, वरील सर्व ” लोकशक्ती कोविड योध्दा ” या पुरस्काराच्या मान्यवरांचा राष्ट्रीय निवड समितीमधील मा.डॉ.संजय अनुसया राजाराम सोनावणे, राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री.विलासराव कोळेकर , अध्यक्ष महाराष्ट्र पत्रकार संघ तथा राष्ट्रीय मुख्य सल्लागार.मा राजेश साखरे , संचालक श्री.विद्या अकॅडमी तथा राष्ट्रीय मुख्य सल्लागार, मा.अॅड . मंगेश नेने , अध्यक्ष पेण एज्युकेशन सोसायटी तथा कायदे विषयक प्रमुख सल्लागार . मा . श्री स्वराज सोनावणे ( लंडन ), राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री. निलेश सोनावणे, राज्यध्यक्ष मा . श्री.धम्मशिल सावंत , राज्य सरचिटणीस श्री.संजय कदम , प्रमुख जनसंपर्क अधिकारी, मा.श्री.मिलन तेंडूलकर , राज्य प्रमुख सल्लागार मा . सौ . वैशाली शिर्के राज्य ऑडीटर यांच्या निवड समितीने सर्व मान्यवर पुरस्कार प्राप्त विजेत्यांची एक मुखाने निवड केली आहे.