20230825 100516
अलिबाग कोकण नवी मुंबई पनवेल सामाजिक

दहावीत शिकणाऱ्या मुलीसोबत अश्लील कृत्य करणाऱ्या अटक

Adivasi samrat logo new website

दहावीत शिकणाऱ्या मुलीसोबत अश्लील कृत्य करणाऱ्या अटक

पनवेल /आदिवासी सम्राट :
दहावी इयत्तेत शिकणाऱ्या 14 वर्षीय मुलीसोबत अश्लील कृत्य करणाऱ्या इकोचालका विरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात पोकसह 363 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रिंकू कुमार साहा (वय 40 राहणार उसरली खुर्द) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

adivasi logo new 21 ok (1)
         14 वर्षीय पीडित तरुणी पनवेल येथील शाळेत दहावी इयत्तेत शिकते. आरोपी तिला शाळेत ने आणण्याचे काम करतो. 22 ऑगस्ट रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास इको गाडीत पीडित मुलगी एकटीच होती यावेळी चालकांने तिला पळस्पे येथे काम आहे असे सांगून नेले आणि गाडीत जाताना अश्लील कृत्य केले. मुलीला घरी यायला उशीर झाल्यानंतर तिच्या आईने विचारल्यानंतर मुलीने घडलेला सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर मुलीच्या आईने पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपी रिंकू कुमार सहा याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

6 + 3 =