Img 20200707 Wa0035
ताज्या नेरळ महाराष्ट्र माथेरान रायगड सामाजिक

इंदिरा गांधी नगर प्रवेशद्वाराचा रस्ता दुर्लक्षित

इंदिरा गांधी नगर प्रवेशद्वाराचा रस्ता दुर्लक्षित



मेन रस्त्यावरून ते गणेश मंदिरा पर्यंत जो कच्चा रस्ता आहे त्यामुळे आम्हाला नाहक त्रास सोसावा लागतोय, येथील पाण्याच्या मोरीचा वरचा भाग पूर्ण कमकुवत झाल्याने त्याच्या दगडी पडून मधेच मोठे भगदाड पडते. त्यामुळे रात्री अपरात्री येथून येताना घोडे किंवा आमच्या कोणाचा पाय त्या होलात गेला तर मोठा अपघात होणार आहे तरी लवकर येथे स्लॅब टाकून पेवरब्लॉक चा रस्ता करावा.
– महेश शिंदे,
स्थानिक अश्वपालक
——————————

माथेरान/ चंद्रकांत सुतार :
इंदिरा गांधी नगर प्रवेशद्वाराचा रस्ता कित्येक वर्षे दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहे, माथेरान गावठाण क्षेत्रात एकूण आठ नगर आहेत, प्रत्येक नगरात मेन रस्ता पासून गावा पर्यंत पेव्हरब्लॉक, चिरा दगडाचे रस्ते सुस्थितीत आहेत, परंतु इंदिरा गांधी नगर गेट कमानी पासूनतील ते मेन रोड पर्यंत अजूनही कच्चा रस्ता आहे, अनेकदा ह्या रस्त्याची तात्पुरती डागडुजी करण्यात आली. परंतु, उतार असल्याने माती दगड पावसाच्या प्रवाहाने वाहून जातात महत्वचे येथील पावसाचे पाणी जाण्यासाठी मोरी आहे, ही जागा हे काम रेल्वेचे असल्याने रेल्वे ने अमन लॉज ते माथेरान स्टेशनपर्यंत च्या सर्व मोर्या मागील काळात गेबियन वॉल मध्ये पूर्ण केल्या, केवळ इंदिरा गांधी नगरासमोरील मोरीचे काम त्यांनी केले नाही, रेल्वे आणि रस्ता यामधील अंतर केवळ 6 फुटाचे असल्याने त्या रस्त्याच्या मधोमध मोरीचा स्लॅब कमकुवत झाल्याने मोठाले होल पडले आहे, याच रस्त्याने इंदिरा नगर वासीय येजा करत आहेत, याच रस्त्याने घोडेही येत जात आहेत, अश्या वेळी घोड्याचा माणसाचा पाय अचानक त्या होल मध्ये गेल्यास मोठा अपघात होण्याची शक्यता आहे, अनेक आजारी व्यक्तींना अम्ब्युलन्स ची सोय असूनही अब्युलन्स घरापर्यंत येतं नाही त्याला कारण हा रस्ताच रेल्वे जवळ गाडी फिरण्यासाठी जागा नाही अरुंद जागे मुळे गाडी मेन रस्त्यावरून खाली इंदिरा नगर घरापर्यंत येत नसल्याने अनेकदा आजारी व्यक्तींना खुर्चीत बसूवुन अथवा चालत मेन रोड पर्यंत न्यावे लागते, तरी पुढील अनर्थ टाळण्यासाठी नगरपालिकेने इंदिरा नगर मेन गेट ते मेन रोड बाबत लवकर पेव्हर ब्लॉक अथवा चिरा दगडाचा रस्ता करावा ही मागणी इंदिरा गांधी नगर रहिवाशी करत आहेत.