20200830 203027
कोकण ताज्या नवी मुंबई पनवेल महाराष्ट्र रायगड सामाजिक

कोविड – १९ या साथी रोगाच्या सुचनांचे पालन करून आदिवासी जमाती करिता जातीचे दाखल्यांचे शिबीराचे आयोजन

कोविड – १९ या साथी रोगाच्या सुचनांचे पालन करून आदिवासी जमाती करिता जातीचे दाखल्यांचे शिबीराचे आयोजन

तहसीलदार श्री. अमित सानप व आदिवासी सेवा संघ, महाराष्ट्र या संघटनेचा पुढाकार

पनवेल/ सुनिल वारगडा :
आदिवासी समाजातील जातीचे दाखले काढण्यासाठी तहसील कार्यालयात अनेक हेलपाटे मारायला लागत असतात. तसेच ये- जा करण्यासाठी आर्थिक ही खर्च होत असतो. त्यातच कोविड १९ या साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव अधिक असल्याने शहरी ठिकाणी ये- जा करतांना कोविड – १९ ची लागण होऊ नये, म्हणून पनवेलचे तहसीलदार श्री. अमित सानप यांना निवेदन देवून आदिवासी सेवा संघ महाराष्ट्र राज्याच्या पनवेल तालुका कमिटीच्या वतीने आदिवासी कातकरी जमाती करिता जातीच्या दाखल्यांचे शिबीरांचे आयोजन सेवा संघाचे अध्यक्ष गणपत वारगडा यांनी पनवेल येथील शिवनसई येथे करण्यात आले होते.

कोविड – १९ या साथीच्या रोगाचा अधिक प्रादूर्भाव असल्याने तहसीलदार श्री. अमित सानप यांनी दिलेल्या सुचनांचे पालन करण्यात आले. या आदिवासी कातकरी जमातीच्या जातीच्या दाखल्यांचे शिबीरात जवळपास १३० जातीचे दाखले व ५० उत्पन्नाचे दाखल्यांचे अर्ज भरले असून जातीचे दाखले लवकरात लवकर वाटप करण्यात येणार आहेत.
या आदिवासी कातकरी जमातीच्या जातीचे दाखले शिबिरास एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेण कार्यालयातील निरिक्षक जगदीश भानुशाली, तहसील कार्यालयातील मोर्बे मंडळ अधिकारी, तलाठी श्री. मांढरे, श्री. मेस्रा, कोतवाल सिताराम वारगडा, पद्माकर चौधरी, गौरव दरवडा, शेतू विभागातील कर्मचारी, शिवनसई येथील सरपंच अनुराधा वाघमारे, समाजसेवक गणेश साहू, विष्णू वाघमारे आदी. ग्रामस्थ उपस्थित होते.