सेवा सोशल सर्व्हिस सोसायटी तर्फे आदिवासींना जीवनावश्यक वस्तूंचा वाटप
खालापूर/ यशवंत वाघ:
कोवीड- १९ या साथीच्या रोगाचा सामना करत असतांना आदिवासींना उपासमारीचे दिवस येवू नये, म्हणून सेवा सोशल सर्व्हिस सोसायटी तर्फे आदिवासींना जीवनावश्यक वस्तूंचा वाटप करण्यात आले.
साधारणतः खालापूर तालुक्यामधील 1000 आदिवासी कुटूंबांना सेवा सोशल सर्व्हिस सोसायटी तर्फे जीवनावश्यक वस्तूंचा वाटप करण्यात आले. यावेळी बिशॉप फादर सानू सॅम, स्कूल प्रिन्सिपल जिनी समुले, समन्वयक मंगेश भंडारे, जगदीश चाळके, वासंती धांद्रुत, कांचन सावंत, इसांबे ग्रामपंचायतचे सरपंच श्री. विकार देवघर, यशवंत वाघ उपस्थित होते.