20210921 145046
कर्जत ताज्या नेरळ सामाजिक

नेरळ शहर चोरांच्या विळख्यात; एका रात्रीत नऊ दुकाने फोडली

नेरळ शहर चोरांच्या विळख्यात; एका रात्रीत नऊ दुकाने फोडली

नेरळ/ नितीन पारधी :
वाढते शहरीकरण म्हणून ओळख निर्माण करू पाहणारे नेरळ शहर सध्या चोरांच्या विळख्यात अडकून पडलंय. शहरात मध्यरात्रीच्या सुमारास एकाच वेळी नेरळ पूर्व परिसरात तब्बल नऊ दुकाने चोरांनी फोडली आहेत. या घटनेने शहरात भीतीचे वातावरण पसरले असून नेरळ पोलीसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उभे करून ठेवलं आहे.

एकीकडे नेरळ शहराचा विस्तार होत असताना, शहरात गुन्हेगारी देखील पाय रोवू लागली. गेल्या काही महिन्यात शहराच्या चारही बाजू कडून चोरीच्या घटना समोर येऊ लागल्यात,भर बाजारपेठेत खरेदीदारांचे पैसे चोरीला जात आहेत. तर काही परिसरात बंद घरे फोडली जात असून सामानाची चोरी होताना समोर आलं. तर नेरळ बस स्थानक परिसरात व्यापार करण्यासाठी आलेले व्यापारी हे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या दहशतवादीचे शिकार ठरत असताना, पोलीस यंत्रणा या गुन्हेगारी दहशतवाद्यांना अद्याप रोखू शकलेली नसल्याचे चित्र समोर येत आहेत.
काही छोटे गुन्हे उघडकीस आणून आपली पाठ थोपटू पाहणारे पोलीस, वाढती गुन्हेगारीवर रोख कधी मिळवणार असा प्रश्न समोर असतानाच. मध्यरात्रीच्या सुमारास नेरळ शहराच्या पूर्वीकडे येणाऱ्या एक नंबर नेरळ रेल्वे स्थानकाला लागून असणाऱ्या सरकारी प्राथमिक आरोग्य केंद्राजवळील नऊ दुकाने चोरांनी एका रात्रीत फोडून नेरळ पोलिसांना जणू या चोरांनी अवाहनच केलं. यात काही दुकानदार मालकाचे गळ्यातील काही किरकोळ पैसे जरी चोरीला गेले असले तरी यात त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या घटना आता सातत्याने शहरात घडू लागल्याने, जणू नेरळ शहर आता या चोरांच्या विळख्यात सापडलाय असेच समोर आलंय.

———————-
एकूणच देशावर आलेली कोरोना महामारीमुळे सर्वसामान्याचे जीवन जगणे कठीण होऊन बसले असताना वाढती गुन्हेगारी गळ्याला फास आवळणारी ठरत आहे. त्यामुळे शहरात वाढत असलेली गुन्हेगारीवर नेरळ पोलिसाचे अंकुश नसल्याने अपयशी ठरत असलेले नेरळ पोलीस नेमकं काय काम करते असा प्रश्न आता यानिमित्य उपस्थित राहत आहे.
– अशीफ अत्तार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

+ 74 = 84