20210713 161530
ताज्या नवी मुंबई पनवेल सामाजिक

आदिवासी बांधवांसाठी कृषी विषयक प्रशिक्षण शिबीर संपन्न

आदिवासी बांधवांसाठी कृषी विषयक प्रशिक्षण शिबीर संपन्न

पनवेल/ प्रतिनिधी :
तालुक्यातील सारसई विभागातील टपोरा वाडी आणि गोविंद वाडी येथील आदिवासी शेतकऱ्यांसाठी युसूफ मेहेरली सेंटरच्या वतीने नुकताच दोन दिवसीय कृषी विषयक प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. 
प्रकल्प संचालक सुरेश रासम यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या ह्या प्रशिक्षण कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून तालुका कृषी अधिकारी ईश्वर चौधरी सेंटरचे उपाध्यक्ष हरेश शहा, भारत कृषी समाजचे कृषी तज्ञ जेकब नल्लिनाथन, सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर, बाळकृष्ण सावंत अंजना पवार, स्मिता कांबळे, कृषि सहाय्यक प्रसाद पाटील ग्रामपंचायत सदस्या मनिषा वाघे,
अंजना पवार आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रशिक्षणात मल्लिनाथन यांनी उपस्थिना खरीप हंगामात आधुनिक पद्धतीने भात,नाचनी, वरी लागवड पद्धती विषयी मार्गदर्शन केले तर कृषी अधिकारी चौधरी यांनी आदिवासी बांधवांसाठी बांधावर तूर लागवड म.ग्रा.रो.ह.योजना, फळबाग लागवड, पिक विमा योजना, बांबू लागवड, शेवगा लागवड व परसबाग लागवडीसह शासनाच्या विविध योजनांबद्दल मार्गदर्शन केले हे प्रशिक्षण यशस्वी करण्यासाठी तेजस चव्हाण, महेश गंगावार,राम वाघे, रेहमान शेख यांनी मेहनत घेतली.