Img 20210713 Wa0105
कोकण ठाणे ताज्या नवी मुंबई पनवेल सामाजिक

पनवेल परिसरात घरफोडी करणार्‍या सराईत गुन्हेगारांना पनवेल शहर पोलिसांनी केले गजाआड

पनवेल परिसरात घरफोडी करणार्‍या सराईत गुन्हेगारांना पनवेल शहर पोलिसांनी केले गजाआड

पनवेल/ संजय कदम :
पनवेल शहर परिसरात घरफोड्या करणार्‍या तीन सराईत गुन्हेगारांना पनवेल शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने गजाआड करून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात मुद्देमाल हस्तगत केला आहे.


पनवेल शहर पोलीस ठाणे हद्दीतील कृष्णा मोबाईल शॉप, हिरा मनिष अपार्टमेंट, पनवेल येथे कोणीतरी अज्ञात चोरटयाने घरफोडी चोरी करुन मोबाईल फोन व इतर मोबाईल साहीत्य चोरी करुन नेल्याची तक्रार करण्यात आली होती. वाढत्या घरफोडी, चोरीचे गुन्ह्यांच्या प्रमाणानुसार पोलीस आयुक्त बीपिन कुमार सिंह, पोलीस सहआयुक्त डॉ.जय जाधव, पोलीस उप आयुक्त शिवराज पाटील व सहा. पोलीस आयुक्त, भागवत सोनवणे यांनी विशेष प्रयत्न करत सदरचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सुचना दिल्या होत्या. त्यानुसार पनवेल शहर पोलीस ठाणेचे वपोनि अजयकुमार लांडगे व पोनि (गुन्हे) संजय जोशी यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सपोनि अनिल देवळे, पोउपनिरी सुनिल तारमळे, पोहवा रविद्र राऊत, पोना परेश म्हात्रे, पोशि सुनिल गर्दनमारे, पोशि युवराज राऊत, पोशि विवेक पारासुर, पोना विनोद पाटील,पोशि यादवराव घुले, पोना पंकज पवार, पोना गणेश चौधरी, पोशि खेडकर व पोशि भगवान साळुंखे आदींच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेज प्राप्त केले होते. एका आरोपीचे हातावर व दुसर्‍या आरोपीचे मानेवर टॅटू असल्याचे दिसत होते.


सदर आरोपी बाबत गोपनिय बातमीदारा मार्फत माहीती काढुन पनवेल शहर पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी सदर गुन्हयातील आरोपी निलेश अनिल दामोदर, (वय 29 रा.पोदी जुना रेल्वे फाटक झोपडपट्टी, से.16,नवीन पनवेल), समीर संभाजी धुलप, (वय 28 वर्षे, रा.पंचशिल नगर झोपडपट्टी नवीन पनवेल) व  महेश प्रभाकर चवरकर (वय 30 वर्षे, रा.पंचशिल नगर झोपडपट्टी नवीन पनवेल) यांना ताब्यात घेवून त्यांच्याकडून 2,01,590 /- रूपये किंमतीचे 16 मोबाईल फोन, 19,100/- रुपये किंमतीचे 6 हेडफोन, रमार्ट वॉच, वॉच चार्जर,्मार्ट चार्जर, पॉवरबॅक, युएसबी वायर, इत्यादी, 5,000/- रूपये किंमतीची 9 ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी व 9 ग्रॅम वजनाचे सोन्याचे पान, 3,000/- रुपये रोख रक्कम, 150/-रूपये किंमतीची एक लोखंडी कटावणी व एक रकु ड्रायव्हर असा मिळून 2,28,840/- ऐवज हस्तगत केला आहे. सदर गुन्हयातील अटक आरोपी हे एकमेकांचे मित्र आहेत. सदर आरोपीत हे रात्रीच्या वेळेस कटावणी व स्क्रु ड्रायव्हरच्या सहाय्याने दुकान व घर फोडुन घरफोडी चोरी करतात. घरफोडी चोरी करुन मिळालेल्या वस्तु नाक्यावरील कामगार लोकांना विकत असतात असे तपासात निष्पन्न झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

7 + 1 =