Img 20210724 Wa0018
ताज्या नवी मुंबई पनवेल सामाजिक

पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी दत्तात्रय पाटील यांची निवड

पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी दत्तात्रय पाटील यांची निवड

आमदार बाळाराम पाटील यांनी केले अभिनंदन

पनवेल/ प्रतिनिधी :
पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी डॉक्टर दत्तात्रय पाटील यांची एकमताने निवड करण्यात आली. जिल्हा उपनिबंधक गोपाळ मावळे यांच्या देखरेखीखाली दस्तावेजांची औपचारिकता पूर्ण केल्यानंतर दत्तात्रय पाटील यांची सभापतीपदी एकमताने निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. यावेळी आमदार बाळाराम पाटील यांनी दत्तात्रय पाटील यांचे अभिनंदन करून त्यांना यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.


शेतकरी कामगार पक्ष हा कार्यकर्त्यांचा पक्ष म्हणून ओळखला जातो. एखाद्या संस्थेमध्ये पदाधिकारी म्हणून त्या संस्थेतील प्रत्येक सदस्याला काम करण्याची संधी दिली जाते. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील हाच कित्ता गिरविला जातो. संस्थांचे शीर्ष स्थान भूषविण्याची संधी प्रत्येकाला मिळाली पाहिजे ही त्या पाठीमागची प्रामाणिक भावना आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती पनवेल चे मावळते अध्यक्ष राम भोईर यांचा कार्यकाळ संपुष्टात येण्यापूर्वीच त्यांनी राजीनामा देऊन पक्ष शिस्तीचे आदर्श उदाहरण तमाम कार्यकर्त्यांसमोर प्रस्तुत केले. इतकेच नव्हे तर मोठ्या खिलाडू वृत्तीने त्यांनी दत्तात्रेय पाटील यांचे स्वागत करून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भरभराटीसाठी आपण सारे मिळून प्रयत्न करूयात व त्यासाठी आम्ही सर्व तुमच्या सोबत असू अशी भावना व्यक्त केली.
दत्तात्रय पाटील यांनी सभापती बनण्याची संधी दिल्याबद्दल पक्षातील ज्येष्ठ नेत्यांचे आभार मानले तसेच पक्षाने जो विश्वास त्यांच्यावर दाखविला आहे त्या विश्वासाच्या कसोटीवर खरे उतरून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रगतीसाठी भरीव कामगिरी करीन सांगितले.

आमदार बाळाराम पाटील यांनी दत्तात्रय पाटील यांना यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी त्यांच्या समवेत माजी नगराध्यक्ष जे एम म्हात्रे, पनवेल विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष काशिनाथ पाटील, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजेंद्र पाटील, पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, पनवेल महानगरपालिका जिल्हा चिटणीस नगरसेवक गणेश कडू,तालुका चिटणीस राजेश केणी, माजी तालुका चिटणीस नारायण शेठ घरत, रघुनाथ शेठ घरत, बाजार समिती संचालक राम भोईर, एस के नाईक, मोहन कडू, रमाकांत गरुडे, प्रज्योती प्रकाश म्हात्रे, मेघा म्हस्कर, संतोष पाटील,संतोष कृष्णा पाटील, सुनील सोनावळे, प्रकाश पाटील,रुपेश पाटील, हरिश्चंद्र म्हस्के, महादू गायकर, सुरेश भोईर, नगरसेविका सारिका भगत,अतुल भगत, सहकारी भात गिरणीचे चेअरमन एम सी पाटील, ज्ञानेश्वर मोरे, देवेंद्र पाटील, देवेंद्र मढवी, कामगार नेते प्रकाश म्हात्रे, प्रकाश नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

+ 18 = 27