Img 20211012 Wa0017
कोकण ताज्या पनवेल महाराष्ट्र सामाजिक

मिशन कवच कुंडल महिला लसीकरण कार्यक्रमास पनवेल तालुक्यात उस्फुर्त प्रतिसाद

मिशन कवच कुंडल महिला लसीकरण कार्यक्रमास पनवेल तालुक्यात उस्फुर्त प्रतिसाद

पनवेल/ प्रतिनिधी :
महाराष्ट्र शासनातर्फे लसीकरणाची विशेष मोहीम सुरू केली असून नवरात्री निमित्ताने महिलांना कोविड लस देण्यासाठी कवच-कुंडल अभियान राबविले आहे. मिशन कवच-कुंडल महिला लसीकरण कार्यक्रमास पनवेल तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
कोविड महामारीच्या तिसऱ्या लाटेचा धोका पाहता ही लाट येण्या आधीच मोठ्या प्रमाणात लसीकरण झाले पाहिजे या दृष्टीकोनातून शासनातर्फे विशेष लसीकरण मोहीम राबविली आहे. या मोहिमेत समाजातील महिलांसाठी नवरात्री निमित्ताने विशेष कवच-कुंडल नावाने विशेष अभियान सुरू केले. मिशन कवच कुडल अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र उलवे, प्राथमिक आरोग्य केंद्र वावंजे पनवेल मार्फत चिन्द्रन गामपंचायत येथे रायगड जिल्हा परिषद अध्यक्षा योगिता पारधी व पंचायत समिती सदस्या वैशाली देशेकर, सरपंच कमला देशेकर,डॉ राज चव्हाण वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होते. नारपोली प्रा.आ.कें.आजीवली तालुका पनवेल येथे मीशन कवचकुंडल अंतर्गत विशेष महीला कोवीड लसीकरण सत्राला जिल्हा आरोग्य अधिकारी यानी भेट दिली. प्राथमिक आरोग्य केंद्र नेरे, जांभिवली व नानोशी येथे महिला लसीकरणास उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. उपकेंद्र दापोली, माणघर,मोसारे,नानोशी, पाटणोली, गराडा बेलवाडी येथे विशेष कोव्हिड लसीकरण मोहीम महिलांसाठी राबविल्यामुळे जास्तीत जास्त महिलांचे प्राधान्याने लसीकरण करण्यात आले आहे. यावेळी सरपंच, उपसरपंच सदस्य यांच्या समवेत आरोग्यसेवक श्री.पाटील, आरोग्य सेविका श्रीम वायरे, ग्रामसेविका, अशा स्वयंसेविका मदतनीस, ग्रामपंचायत ऑपरेटर यांच्या उपस्थितीत हे अभियान सुरू आहे.गरोदर माता, स्तनदा माता, महिला, bedridden Patients याना प्राधान्य देण्यात आले.
यावेळी तहसीलदार विजय तळेकर, यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी, सरपंच, उपसरपंच, सदस्य, कर्मचारी आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.