20201030 124427
ताज्या महाराष्ट्र मुंबई सामाजिक

हसत खेळत सोप्या पध्दतीने ऑनलाईन शिक्षण घेण्याकरिता पनवेल येथील करंजाडे वेदिक ट्री प्री स्कुल ने स्मार्ट फोन अॅपचे केली निर्मीती

हसत खेळत सोप्या पध्दतीने ऑनलाईन शिक्षण घेण्याकरिता पनवेल येथील करंजाडे वेदिक ट्री प्री स्कुल ने स्मार्ट फोन अॅपचे केली निर्मीती

पनवेल/ प्रतिनिधी :
जागतिक कोरोना संकटामुळे जगातल्या बहुतेक देशांवर आर्थिक संकट ओढावले आहे. आपल्या भारत देशातही कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त असल्याने त्याचा भारतीय शिक्षण पद्धतीवर मोठा परिणाम झाला असून माध्यमिक, उच्च माध्यमिक इयत्तांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला. नवजात बालके ज्याचे नुकतेच शाळेत जाऊन शिकण्याचे वय झाले आहे अशा अनेक मध्यम वर्गीय बालकांना तर कोरोना संकटामुळे बालवाडी, पाळणाघर, प्राथमिक शाळा, पूर्व प्राथमिक शाळा इत्यादी बंद असल्याने शिक्षणाचा मार्ग बंद झाला आहे. तसेच शहरी किंवा ग्रामीण भागातील जे विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणप्रणालीने शिक्षण घेत आहेत त्यांना नेटवर्क कनेक्टिव्हिटी अभावी ऑनलाईन चालणारे क्लास पूर्ण पाहता येत नाहीत. तसेच इतर अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. यामुळे बहुतांश विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून पालकांचेही आर्थिक नुकसान होत आहे.
कोरोना मुळे शाळेत जाण्याचे वय झालेल्या कोणत्याही नवजात बालकाचा शैक्षणिक विकास थांबू नये, तसेच कमीत कमी किमतीत बालकांना उच्च प्रतीचे इंग्लिश मिडीयम चे शिक्षण मिळावे या हेतूने वेदिक ट्री प्री स्कुल, करंजाडे (पनवेल) यांनी नेटवर्क कनेक्टिव्हिटी समस्येवर मात करणाऱ्या, ऑनलाईन शिक्षण कार्यप्रणालीतील इतर समस्यांवर मात करणाऱ्या तसेच लहान मुलांना व त्यांच्या पालकांना त्यांच्या उपलब्ध वेळेनुसार, उच्च प्रतीच्या व्हिजुअल ग्राफिक्स तसेच ऑडिओ इफेक्ट सोबत हसत, खेळत सोप्या पद्धतीने शिकता येईल अशा संकल्पनेतून  स्मार्टफोन अँप चे निर्माण करण्यात आले. दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर वेदिक ट्री एज्युकेअर चे सी.ओ.ओ. श्री दिपक ठक्कर याच्या शुभहस्ते विद्येचे माहेरघर पुणे येथे अनावरण करण्यात आले. तसेच हे अँप सर्वांसाठी १ महिना विनाशुल्क उपलब्ध करून देण्यात आले आहे.
या अँपच्या माध्यमातून लहान मुले अगदी सोप्या पद्धतीने शिक्षण घेऊन स्वतःचा बौद्धिक विकास करून घेतला असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या अँपच्या माध्यमातून फिजिकल शाळेत शिकवले जाणारे सर्व विषय प्री रेकॉर्डेड भागांमध्ये शिकवले जाणार असून शैक्षणिक वर्ष पूर्ण झाल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना शाळेद्वारे प्रमाणपत्र देखील दिले जाणार असून त्याचा उपयोग पुढील शैक्षणिक वर्षात प्रवेश घेण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. सदर अँप अनावरण सोहळ्यादरम्यान संस्थापक श्री.विवेक ठक्कर, सीईओ श्री.विश्वजित पांडे, सौ.काजल ठक्कर, सौ.विद्या बागवे, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
—————————–

या अँपच्या ऑनलाईन शिक्षण कार्यप्रणालीबद्दल तसेच आपल्या पाल्याच्या प्रवेशाबद्दल अधिक माहितीसाठी इच्छुकांनी खालील क्रमांकावर संपर्क साधावा.
संपर्क क्रमांक : 9320067800www.vedictreeschool.onlineFree Download App : https://play.google.com/store/apps/details?id=com.vedic.preschool