20211128 100153
कल्याण कोकण ठाणे ताज्या दिल्ली पनवेल रायगड सामाजिक

संविधान दिनानिमित्त एन.डी.एम.जे. तर्फे आदिवासी विद्यार्थ्यांना ‘भारतीय संविधान’ भेट व अत्याचार पिडीतांना रेशन वाटप…

संविधान दिनानिमित्त एन.डी.एम.जे. तर्फे आदिवासी विद्यार्थ्यांना ‘भारतीय संविधान’ भेट व अत्याचार पिडीतांना रेशन वाटप…

 

पनवेल/ प्रतिनिधी :
नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टिस (एन.डी.एम.जे.) संघटनेचा “भारतीय संविधान आदिवासींच्या दारी” हा अगळा-वेगळा उपक्रम रायगड जिल्ह्याच्या हेदूटने गावातील आदिवासीवाडी येथे शनिवार (दि. २६ नोव्हें.) रोजी राबविण्यात आला.
सदर कार्यक्रमात एन.डी.एम.जे. संघटनेच्या वतीने राज्याचे महासचिव तथा महिला व बालविकास विभागाच्या मार्गदर्शक समितीचे मंत्रालईन सदस्य मा. ॲड. डॉ. केवल उके यांच्या शुभ हस्ते अनेक होतकरू आदिवासी विद्यार्थ्यांना भारतीय संविधानाची प्रत भेट देण्यात आली.


भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करत भारतीय संविधानाच्या उद्देशिकाचे वाचन करण्यात आले. या ठिकाणी हेदुटने गावातील आदिवासी वस्तीवर झालेल्या हल्ल्याच्या अत्याचार पिडीत आदिवासी कुटुंबांसह ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील इतर अत्याचार पिडीतांना एक महिन्याचे रेशन वाटप करण्यात आले. देश आज स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना देशातील आदिवासी समुदाया पर्यंत अद्याप शिक्षण सुद्धा पूर्णपणे पोहचले नाही. आदिवासी समाज आजही अनेक मूलभूत सुविधांपासून वंचित आहे. त्यांच्या जमिनी अवैधरीत्या बळकावल्या जात असून अनेक प्रकारच्या जातीय अत्याचाराला हा समाज बळी पडतोय. हे सगळे थांबावे, त्यांच्यात शिक्षणाचा प्रचार प्रसार व्हावा, भारतीय संविधानाचे महत्त्व व घटनादत्त मूलभूत अधिकारांची आदिवासी समाजात जनजागृती व्हावी, संवैधानिक मुल्य आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये रुजावेत या उद्दिष्टाने प्रबोधन करण्यात आले.
यावेळी मुख्य आयोजक तथा एन.डी.एम.जे. राज्यनिरीक्षक बी.पी.लांडगे कोकण प्रदेश उपाध्यक्ष मा.शोभाताई जाधव, मुंबई ठाणे प्रदेशाध्यक्ष मा.बंदीश सोनवणे, ठाणे जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आयु. विजय काबंळे, जिल्हा सचिव मा. विनोद रोकडे, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख मा. संदेश भालेराव, कल्याण डोंबिवली शहरजिल्हाध्यक्ष ॲड. प्रविण बोदडे इत्यादी उपस्थित होते. या संविधान जनजागृती कार्यक्रमाचे संचालन मुख्याध्यापक मा.मंगेश जाधव यांनी केले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता उपसरपंच कैलास पाटील, शुभम जाधव, हिरामण उघडा, मच्छिंद्र नाईक, रामा वाघमारे, बबिता उघडा व आदिवासी पाड्यातील इतर सभासदांनी परिश्रम घेतले.