आदिवासी विकास परिषद, राष्ट्रीय दलित न्याय हक्क आंदोलन यांच्या संयुक्ताने पूरग्रस्त भागातील गरीब विध्यार्थ्याना वह्या व महिलांना साड्यांचे वाटप
नवी मुंबई/प्रतिनिधी :
आदिवासी विकास परिषद व राष्ट्रीय दलित न्याय हक्क आंदोलन या सामाजिक संघटनेने कोल्हापूर येथील इचलकरंजी या ठिकाणी महेश भाट यांच्या मार्गदर्शनाखाली पूरग्रस्त भागातील गरीब विध्यार्थ्याना वह्याचे वाटप करून महिलांना साड्याचे वाटप करण्यात आले.
कोल्हापूर भागात अनेक ठिकाणी पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून इचलकरंजी या भागातही पुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने आदिवासी विकास परिषद व राष्ट्रीय दलित न्याय हक्क आंदोलन या संघटनेतील बी.पी. लांडगे, महेश भाट यांनी अंबरनाथ येथील सामाजिक व राजकीय क्षेत्रात असणारे पंचायत समितीचे सदस्य बाळाराम कांबरी यांना या संदर्भात माहिती देताच बाळाराम कांबरी यांनी एक हजार आठ वह्या उपलब्ध करून दिल्या. तसेच शोभा जाधव, किशोर पाटील यांनी काही प्रमाणात साड्या उपलब्ध करून कोल्हापूर येथील इचलकरंजी या भागातील गरीब, गरजू विद्यार्थी व महिलांना वाटप केले गेले.
यावेळी राष्ट्रीय दलित न्याय हक्क आंदोलन संघटनेचे राज्य निरीक्षक महेश भाट, आदिवासी विकास परिषदेचे सचिव बी.पी. लांडगे, पंचायत समिती सदस्य बाळाराम कांबरी, ठाणे जिल्हा अध्यक्ष संतोष भगत, ठाणे जिल्हा सचिव बंदिश सोनावणे, संघटनेचे कार्यकर्त्या शोभा जाधव, किशोर पाटील आदी. कार्यकर्ते उपस्थित होते.