- आदिवासी ठाकुर समाजाच्या समाज भवनाचा लोकार्पण
- आदिवासी ठाकूर समाजाच्या विकासासाठी कटिबध्द – आ. धैर्यशील पाटील
- गुणवंत विद्यार्थ्यांचा व सामाजिक क्षेत्रात काम करण-या व्यक्तीचा संस्थेच्या वतीने केले सत्कार
शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून आदिवासी वाड्या पाड्या पर्यंत रस्ते, पाणी, विज व अन्य मूलभूत सेवा सुविधा देण्याचे काम केले. निवडणुकीत मते किती मिळाली याचे मूल्यमापन न करता विकासकामांचा दिलेला शब्द पाळले यालाच अधिक महत्व दिले.
– आमदार, धैर्यशील पाटील.
—————————————————
सुधागड-पाली/प्रतिनिधी:
सह्याद्री आदिवासी ठाकुर समाज संस्था सुधागड पाली येथील आदिवासी ठाकूर समाज भवनाचे शनिवारी आमदार धैर्यशील पाटील यांचे हस्ते व जि.प.सदस्य सुरेश खैरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पाली येथे लोकार्पण करण्यात आले.
या कार्यक्रमात इयत्ता 10 वी, 12 वी व पदवी पास झालेल्या आदिवासी ठाकुर समाजातील गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थिनींचा तसेच सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणा-या व्यक्तीचा देखील संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आले. सामाजिक क्षेत्रात काम करणा-या व्यक्तींची व आदिवासी ठाकुर समाजातील विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश पाहून उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
आमदार धैर्यशील पाटील यांनी सांगितले की आदिवासी ठाकुर समाज हा डोंगर द-यात राहणारा समाज असून तो शिक्षणाच्या जोरावर पुढे येत आहे ही बाब समाजासाठी कौतुकास्पद आहे. आजच्या या स्पर्धात्मक युगात आदिवासी ठाकुर समाज हा शैक्षणिक क्षेत्रात स्पर्धा करू पहातोय. आदिवासी समाजाच्या मूलभूत सोयी- सुविधा मिळणे आवश्यक आहे. रस्ते, विज व पाणी हे सर्व आदिवासी भागात पोहचले पाहीजे. यासाठी मी प्रयत्नशिल आहे, असे आ. धैर्यशील पाटील यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले.
पाली शहरात आदिवासी ठाकुर समाजाचे समाज भवन अस्तित्वात नव्हते म्हणून काही अनेक वर्षापासून सह्याद्री आदिवासी ठाकुर समाज संस्था सुधागड पाली व येथील पंचायत समितीच्या सदस्या सौ.सविताताई हंबीर या आदिवासी ठाकूर समाज भवनासाठी प्रयत्न करत होते. शेवटी आमदार धैर्यशील पाटील यांच्या सन 2018-19 या स्थानिक विकास कार्यक्रम अंतर्गत 5 लाख निधी व आदिवासी ठाकूर समाजाच्या प्रत्येक गाव- वाड्यातून जमा केलेली लोकवर्गणीच्या साहाय्याने पाली येथे आदिवासी ठाकुर समाज भवन उभारण्यात यश आले.
या आदिवासी ठाकूर समाज भवनासाठी पंचायत समितीच्या सदस्या व तालुका महिला अध्यक्षा सविताताई हंबीर, तालुकाध्यक्ष यशवंत हंबीर, उपाध्यक्ष पी. डी. ढुमणा, वाय. के. वारगुडे, मंगल हंबीर, मिलिंद वारगुडे, भगवान हंबीर, उत्तम डोके, बबन हिरवे, जी. डी. हंबीर, आर. डी. हंबीर तसेच बांधकाम देखरेख कमिटीचे चंद्रकांत वारगुडे यांनी अहोरात्र मेहनत घेवून अखेर या आदिवासी ठाकूर समाज भवनाचे लोकार्पण शनिवार (दि. 17 ऑगस्ट) रोजी करण्यात आले.
या कार्यक्रमास माजी जि.प.सदस्या गीता पालरेचा, सभापती साक्षी दिघे, सरपंच गणेश बालके, परशुराम वारगुडे, तानाजी फसाळे, सदा भस्मा, मंगल हंबीर, भगवान हंबीर, करूण हंबीर, नितीन हंबीर, पांडुरंग बांगारे, नामदेव ढुमणा, किसन वारघडे, चंद्रकांत वारगुडे, अशोक वारगुडे, दामोदर शिद, गणपत हिरवे, भिवा शिद, मुकंद हंबीर, एकनाथ हंबीर, विष्णू हंबीर, वामन सुतक आदी सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
——————————————————
पाली येथील आदिवासी ठाकूर समाजातील बहुतांश लोक आपल्या उदरनिर्वाहसाठी तसेच गाव, वाड्या- पाड्यातील माणसं आपला रानमेवा व भाजीपाला विकण्यासाठी शहरात यावं लागतं. पण त्यांना कधी तरी रहाण्यासाठी कायम व हक्काची जागा नसल्याने येथील लोकांचे खुप हाल व्हायचं. माञ आता शहरात आदिवासी ठाकूर समाज भवन तयार झाल्याने आदिवासी समाजातील लोकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
– यशवंत हंबीर, तालुकाध्यक्ष
सह्याद्री आदिवासी ठाकूर समाज संस्था, सुधागड- पाली.
वारगडा साहेब संस्था आपली शतशः आभारी आहे.
धन्यवाद वारगडा साहेब …