Img 20220111 Wa0076
कर्जत खालापूर ताज्या नवी मुंबई पनवेल रायगड सामाजिक

देवन्हावे ग्रामपंचायतीचे सरपंचसह सदस्यांनी मानले खासदार सुनील तटकरे यांचे आभार

देवन्हावे ग्रामपंचायतीचे सरपंचसह सदस्यांनी मानले खासदार सुनील तटकरे यांचे आभार

प्रतिनिधी/ किशोर साळुंके :
खालापूर तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत देवनाव्हे येथील नागरिकांच्या जिव्हाळ्याचा समजला जाणारा पाणी प्रश्न हा जलजीवन मिशन अंतर्गत रायगड जिल्हातील देवन्हावे ग्रामपंचायती करिता तब्बल ७.११ कोटीचे पाणी योजनेचे देवनाव्हे ग्रामपंचायत कार्यालयात उदघाट्न करण्यात आले.
देवन्हावे ग्रामस्थनांना भेडसावणा-या महत्वाचा असा गावातील पाणी प्रश्न मार्गी लावण्याबाबत दिलेले आश्वासन पूर्ण केल्याबद्दल खासदार सुनील तटकरे यांचे स्मृतिचिन्ह देऊन ग्रुप ग्रामपंचायत देवन्हावेचे कर्तव्यदक्ष सरपंच अंकित साखरे, उपसरपंच संदेश चौधरीसह सदस्य व ग्रामस्थांनी खासदार सुनिल तटकरे यांचे आभार मानण्यात आले.
शिवाय, पालकमंत्री आदितीताई तटकरे आणि आमदार अनिकेत तटकरे तसेच संबंधित अधिकारी वर्गाने केलेल्या सहकार्याबद्दल यावेळी ग्रामस्थांकडून कौतुक करण्यात आले.
यावेळी सरपंच अंकित साखरे, उपसरपंच संदेश चौधरी, सदस्य भगवान पाटील, देवन्हावे ग्रामस्थ संजय मामा कडव, भूषण कडव, बंटी नलावडे, रोहीदास पाटील, नितीन चौधरी आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

38 + = 47