20220112 195450
अहमदनगर ताज्या महाराष्ट्र सामाजिक

आदिवासी, दलित शेतकऱ्यांना अमानुष मारहाण झाल्याने तात्काळ न्याय द्या अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल; प्रशासनाला दिला इशारा

आदिवासी, दलित शेतकऱ्यांना अमानुष मारहाण झाल्याने तात्काळ न्याय द्या अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल; प्रशासनाला दिला इशारा

अहमदनगर/ प्रतिनिधी :
हिंगोली जिल्ह्यातील पातोंडा गावात वन अधिकारी विश्वनाथ टाक याने दिनांक 5 जानेवारी 2022 रोजी सकाळी 7 वाजता वन विभागाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांसह गरीब वन जमीन धारकांवर, ते कसत असलेल्या वन जमिनीतून त्यांना हाकलून लावण्याच्या उद्देशाने अमानुष मारहाण केली, असा आरोप अखिल भारतीय किसान सभेचे डॉ. अजित नवले यांनी या घटनेचा निषेध केला आहे. 
डॉ. अजित नवले म्हणाले, “हिंगोली जिल्ह्यातील पातोंडा गावात वन जमीन कसणाऱ्या आदिवासी व दलित शेतकऱ्यांवर वन विभागाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांसह गरीब वन जमीन धारकांवर, ते कसत असलेल्या वन जमिनीतून त्यांना हाकलून लावण्याच्या उद्देशाने अमानुष मारहाण केली. अनेक शेतकऱ्यांना जखमी करण्यात आले. संघटीत हल्ला करून शेतकऱ्यांकडून त्यांच्या जमिनी काढून घेण्यात आल्या. किसान सभा या घटनेचा निषेध करते.”


ते पुढे बोलताना डॉ. नवले म्हणाले, “आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबाला किमान 10 लाखाची मदत करा. आत्महत्येस कारणीभूत असणाऱ्या सर्व संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने निलंबित करा व त्यांना कठोर शिक्षा करा, आत्महत्या झालेल्या कुटुंबातील किमान एका सदस्याला कायम सरकारी नोकरी द्या, कसत असणाऱ्या सर्व जमिनी कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावे करा. कसत आलेल्या वन जमिनी बागायती करण्यासाठी शासनाच्या विविध योजनांच्या अंतर्गत या शेतकऱ्यांना प्राधान्याने अनुदान उपलब्ध करून द्या, अन्यथा किसान सभा महाराष्ट्रभर या घटनेच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात येईल, असा इशारा डॉ. नवले यांनी दिला आहे.