IMG-20210124-WA0071
कोकण ताज्या पुणे महाराष्ट्र सामाजिक

अठरा महिने उलटूनही न्याय न मिळाल्याने पुणे जिल्हाधिकारी कार्यालया समोर करावे लागले; लक्षवेधी उपोषण

अठरा महिने उलटूनही न्याय न मिळाल्याने पुणे जिल्हाधिकारी कार्यालया समोर करावे लागले; लक्षवेधी उपोषण

बिरसा ब्रिगेड सह्याद्री, आदिवासी सेवा संघ, पुणे जिल्हा व आदिवासी विचार मंच या संघटनांचा पुढाकार

पुणे/ अविनाश मुंढे :
निसर्गवासी दीपाली राजाराम लोहकरे या आदिवासी कन्येच्या मृत्यूची चौकशी करून न्याय मिळवून देण्यासाठी बिरसा ब्रिगेड सह्याद्रीचे अध्यक्ष काशिनाथ कोरडे व कार्याध्यक्ष डॉ. विनोद केदारी यांच्या मार्गदर्शनाखाली आदिवासी सेवा संघ बिरसा ब्रिगेड सह्याद्री, आदिवासी विचार मंच महाराष्ट्र राज्य व सहयोगी संघटनांनी तसेच समस्त आदिवासी समाजाने जिल्हाधिकारी कार्यालय पुणे याठिकाणी लक्षवेधी उपोषण केले.
मा. जिल्हाधिकारी यांना प्रत्यक्ष निवेदन देऊन निसर्गवासी दीपाली राजाराम लोहकरे हीच्या मृत्यूची चौकशी व्हावी व संबंधित कन्येच्या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्या व्यक्तींवर गुन्हे दाखल होऊन शिक्षा व्हावी व न्याय मिळावा. याप्रसंगी आदीवासी सेवा संघ व बीरसा ब्रिगेड सह्याद्रीच्या कार्यकर्त्या व नगरसेविका सौ स्वाती पारधी, सामाजिक कार्यकर्ते आदि शंकर घोडे तसेच आदिवासी सेवा संघ जिल्हा उपाध्यक्ष आदि अविनाश मुंढे व बिरसा ब्रिगेडचे आदिवासी विचार मंचाचे कार्यकर्ते राजेश गाडेकर,संतोष असवले,निवृत्ती शेळकंदे,तुकाराम बांबळे,विनायक तळपे,आकाश लांघी, कुडळ काका, सुरेश चिमटे, जालिंदर गोंटे, शिवाजी मावळे व इतर पदाधिकारी उपस्थित होते तसेच लोहकरे कुटुंबीय व सहयोगी संघटना उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

+ 43 = 53