घरकाम करण्याच्या बहाण्याने लाखो रुपये किंमतीचे दागिने लंपास करणारी महिला गजाआड
पनवेल/ संजय कदम :
घरकाम करण्याच्या बहाण्याने विश्वास संपादन करून घरातील लाखो रुपये किंमतीचे दागिने लंपास करणार्या महिलेस खारघर पोलिसांनी बीड, कात्रज पुणे येथून ताब्यात घेतले आहे.
खारघर पोलीस ठाणे हद्दीत फिर्यादी नामे श्रीमती लिला चंतुरी गौडा , वय 36 वर्षे , यांनी घरकामास ठेवलेले महिलेने फिर्यादी यांचे घराचे कपाटातील लॉकरमध्ये असलेले सोन्याचे दागिने चोरी केल्याने फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून खारघर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. वर नमुद गुन्हयातील आरोपीताबाबत कोणताही ठोस पुरावा नसताना कौशल्यपुर्वक तांत्रिक तपास करुन यातील महिला आरोपी निता श्याम गर्जे वय 27 वर्षे हिस बिड , कात्रज पुणे येथे जावुन मागोवा घेवुन सदर आरोपी महिलेस अटक करण्यात आली. तिचेकडुन 36 99 50 / -रू किं . सोन्याचे चोरी केलेले दागिने जप्त करण्यात आले आहेत. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त बिपिन कुमार सिंह, सह पोलीस आयुक्त जय जाधव , पोलीस उप आयुक्त शिवराज पाटील , परिमंडळ 2 , पनवेल , भागवत सोनवणे , सहा . पोलीस आयुक्त , पनवेल विभाग, नवी मुंबई यांचे मार्गदर्शनाखाली वपोनि संदीपान शिंदे , सपोनिरी मानसिंग पाटील , पोहवा बाबाजी थोरात , पोशि शिंगाडे , पोशि आव्हाड , मपोशि आंबकर यांनी केलेली आहे . सदर गुन्हयाचा तपास खारघर पोलीस ठाणेमार्फत चालु आहे .