आदिवासी जमीनीवर बेकायदेशीर असणा-या फार्महाऊस मालकांनी ताडपट्टी दफनभूमीचा रस्ता अडवला ; चौकशी करून गुन्हा दाखल करण्याची तहसीलदारांकडे ग्रामस्थांनी केली मागणी
पनवेल/ आदिवासी सम्राट :
आदिवासी समाजात रित- रिवाजाप्रमाणे माणसांचा मृत्यू झाला की त्याची दफन करण्यात येत असतेय. त्यामुळे रायगड जिल्ह्यात सर्व आदिवासी गावामध्ये पुर्वीपासूनच दफनभूम्या आहेत. त्यासाठी पिढ्यांपिढ्यापासून दफनभूमीकडे जाणारे वहिवाटीचे रस्ते आहेत, काही दफनभूमीकडे जाणा-या वहिवाटीच्या रस्त्याला अनेकदा ग्रामपंचायतीने खर्च देखील करत आहेत. माञ, हेच वहिवाटीचे रस्ते उद्योजक व फार्महाऊसवाल्यांनी दादागिरी, हुकूमशाहीचा व पैसाचा वापर करत आहेत. याचा परिणाम वहिवाटीचे रस्ते बंद होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे अनेकांना नाहक ञास सहन करावा लागत असतोय.
असाच प्रकार पनवेल तालुक्यातील मौजे मालडूंगे येथील ताडपट्टी व कोंबलटेकडी या दोन आदिवासी गावाच्या बाबतीत झाला आहे. ५ ते ६ पिढ्यांपासून असणारी दफनभूमी आणि त्याकडे जाणारा वहिवाटीचा रस्ता आता आदिवासी जमिनीवर बेकायदेशीर फार्महाऊसच्या मालकांनी हा वहिवाटीचा रस्ता काही महिन्यांपूर्वीच बंद केले आहेत. त्यासाठी अनेकदा फार्महाऊसच्या मालकांना विनंत्या केल्या. माञ, दादागिरी, पैसा आणि आदिवासींच्या मुळ मालकांला पुढे करून पोलीस यंञणेचा नाव वापरून आदिवासींना दमकावले जातंय.
त्यामुळे ताडपट्टी व कोंबलटेकडी दफनभूमीकडे जाणारा वहिवाटीची रस्ता खुला करण्यासाठी आदिवासी सेवा संघाच्या वतीने पनवेलचे तहसीलदार विजय पाटील यांना निवेदन दिले आहे. पिढ्यांपिढ्यापासून असणारी दफनभूमी लगत शासनाच्या जमीनी आहेत. त्या जमिनी काही वर्षांपूर्वी भूमीहीन आदिवासी शेतकरी यांना स्वतःचा उदरनिर्वाह करण्यासाठी दिली होती. माञ, शासनाने उदरनिर्वाह करण्यासाठी दिलेली जमीन बिगर आदिवासींना बेकायदेशीर विक्री केली असल्याने ती जमीन शासनाने परत घ्यावी, त्याचबरोबर बिगर आदिवासी व्यक्तींवर अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्याने गुन्हा करण्यात यावी अशी मागणी आदिवासी गावातील जवळपास ५० ग्रामस्थांनी पनवेलचे तहसीलदार विजय पाटील यांच्याकडे केली आहे. यावेळी आदिवासी सेवा संघाचे अध्यक्ष गणपत वारगडा, सचिव सुनिल वारगडा, सिताराम वारगडा, बाळू वारगडा, चंदर चौधरी, आनंता चौधरी, बुधाजी चौधरी, किसन वारगडा, कमळ्या चौधरी, आकाश गडखळ, मोनिका नारायण घुटे, जर्नादन चौधरी आदी. उपस्थित होते.