मुंबईला पाणी पुरवठा करणाऱे मध्यवैतरणा धरण ओव्हर फ्लो
पालघर/ सौरभ कामडी :
मुंबई ला पाणीपुरवठा करणा-या सर्वच धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. मोखाडा तालुक्यात बांधण्यात आलेले मध्यवैतरणा धरण, मोखाड्यात दोन दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसाने ओहरफ्लो झाले आहे. या धरणाचे 5 दरवाजे 20 सेंटीमीटर ने उघडण्यात आले असून या मधून 105 क्यूसेक्स ने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
मोखाडा तालुक्यात जुलै महिन्यात समाधानकारक पाऊस झाला होता, तेव्हा धरण पुर्ण क्षमतेने भरले होते. मात्र ऑगस्ट महिन्यात पावसाने विश्रांती घेतल्याने मुंबई ला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाण्याच्या साठ्यात घट झाली होती. गेल्या दोन दिवसांपासून मोखाड्यात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे पुन्हा एकदा मध्यवैतरणा धरणांच्या पाण्याचा पातळीत वाढ झाली आहे. आजमध्य वैतरणा धरण पुन्हा एकदा ओव्हरफ्लो झाले असुन धरणाचे 5 दरवाजे 20 सेंटीमीटर ने उघडण्यात आले आहे. यामधुन 105 कुसेक्स ने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.