गड- किल्ले विकू देणार नाही
संगमनेर तालुक्यातील पेमगिरी – शहागड येथे शिवप्रेमी भक्तांचा गडावर राबवली स्वच्छता मोहीम.
संगमनेर/ प्रतिनिधी :
महाराष्ट्र शासनाने गड – किल्ले लीज वर देण्याचा म्हणजे एक अर्थाने विकण्याचाच निर्णय घेतला आहे. ज्या गडकिल्यांवर स्वराज्यासाठी मावळ्यांनी रक्त सांडले त्याच गडकिल्ल्यांवर सरकारच्या नवीन धोरणानुसार लग्नसमारंभ आणि मनोरंजनाचे कार्यक्रम होणार. ज्या गडकिल्ल्यांवर कुणी जोडपी काही चाळे करत असतील किंवा कुणी बाटल्या घेऊन जात असतील तरी आम्हाला सहन होत नाही तेथेच हॉटेल्स आणि लॉजिंग सुरू करून सरकार अधिकृत रित्या या सर्व गोष्टीनाच एकप्रकारे प्रोत्साहन देत आहेत. मुख्यमंत्री खोटे बोलून स्वतःची कातडी वाचविण्याचा प्रयत्न करत असून महाराष्ट्रातील सर्व शिवप्रेमींचा त्यांचा तीव्र निषेध करत आहेत.
गड – किल्ले हे आपल्या पूर्वजांनी दिलेल्या बलिदानाचे , त्यांच्या शौर्याचे, त्यागाचे प्रतीक आहेत. महाराष्ट्रातील माणसाला प्रेरणा देणारी स्थळ म्हणजे आपले गडकोट आहेत. महाराष्ट्राच्या प्रत्येक पिढीसाठी प्रेरणा आणि अभिमानाची प्रतीक आहेत. पुढच्या पिढ्यांसमोर गडकोट किल्ले मनोरंजन केंद्र म्हणून नेण्याचा घाट सरकार घालत आहे तो महाराष्ट्रातील जनता कधीही खपवून घेणार नाही. या अनुषंगाने छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या पुतळ्याला अभिवादन करून संगमनेर तालुक्यातील पेमगिरी (शहागड) येथे शेकडोंच्या संख्येने रॅलीने जाऊन सर्व शिवप्रेमी नागरिकांनी किल्ल्यावर स्वच्छता करत केला. त्यानंतर निवडक मावळ्यांनी सरकारचा निषेध नोंदवत मुख्यमंत्र्यांच्या पुतळ्याच्या कडेलोट केला.