20190915_121745
ठाणे ताज्या नंदुरबार नवी मुंबई नाशिक पनवेल पुणे महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी राष्ट्रीय विदर्भ सामाजिक

महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर भवनाचे लोकार्पण…

महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर भवनाचे लोकार्पण..

  •  डाॅ. बाबासाहेब आंबेडकर भवनाचे सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते लोकार्पण
  • भवनासाठी सामाजिक संस्था- संघटनानी सिडकोकडे केला पाठपुरावा.

कळंबोली/ प्रतिनिधी :
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर भवन गरीब जनतेच्या उपयोगात येवून त्यांना दिलासा मिळाला या उद्देशातून उभारण्यात आलेले आहे.  या महामानवाच्या भवनाचे  लोकार्पण माझ्या  हातून होते ही एक गौरवाची बाब आहे. आज या भवनाचे लोकार्पण हा आनंदाचा व अभिमानाचा क्षण आहे, असा प्रकारे पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून अनेक विकास कामे झाली आहेत व होत आहेत. पनवेल हे एक  सुविधांनी सुसज्ज बनविण्याचे काम पालिकेच्या माध्यमातून महापौर व त्यांच्या सदस्यांनी हाती घेतले आहे. महिलाच्या कँन्सर,  त्यांचे स्वावलंबन सारख्या अनेक योजना पालिकेच्या माध्यमातून राबविल्या जात आहेत त्याचा फायदा जास्तीत फायदा महिला वर्गाने घ्यावा असे आवाहन सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले.
‘एकच वादा प्रशांत दादा’ या घोषणेने सर्व परिसर दुमदुमून सोडला होता. त्यांचे जंगी स्वागत  करण्यात आले. ते कळंबोली येथे डाँ बाबासाहेब आंबेडकर भवनच्या लोकार्पण प्रसंगी बोलत होते. ते पुढे म्हणाले की डॉ बाबासाहेब आंबेडकर भारतीय घटनेचे शिल्पकार आहेत कायदेतन्र म्हणून त्यांनी देशाचा गाडा हाकलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाच्या उन्नती व प्रगतीसाठी प्रयत्नशील आहेत. आज त्याच्याच पावलावर पाऊल टाकून आपण जनतेचा विकास करत आहेत पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून महिलांच्या स्वावलंबनासाठी अनेक उपक्रम राबविले आहेत. महिलामध्ये वाढते कँन्सरचे प्रमाण ही एक चिंतेची बाब आहे तेव्हा यावर उपाय म्हणून पालिकेच्या माध्यमातून लसिकरण करण्यात येणार आहे. पालिका माध्यमातून स्मार्ट गावे बनविण्याचे प्रयत्न सुरू आहेत तेव्हा आपण वेगाने प्रगतीकडे वाटचाल करत आहेत असेही त्यांनी सांगितले.

सामाजिक संस्था- संघटनांच्या माध्यमातून कळंबालीमध्ये  डाँ. बाबासाहेब आंबेडकर भवन उभे  राहिले. या भवनाचा लाभ सर्वसामान्य नागरिकांना मिळावा व यातून आयपीएस व आयएसआय अधिकारी घडावे हीच तीव्र इच्छा व्यक्त केली त्यासाठी या भवनात सुसज्ज असे वाचनालय हवे अशी मागणी केली. पनवेल महानगरपालिकेच्या महापौर कविता चौतमोल यांनी सांगितले की सिडकोचे अध्यक्ष प्रशांत ठाकूर असल्यामुळे विकास कामात कोणत्याही अडचणी येत नाहीत त्यामुळे पालिकेच्या माध्यमातून अनेक कामे होत आहेत पालिकेच्या माध्यमातून महिलांसाठी अनेक कोर्स सुरू केले आहेत  त्याच प्रमाणे मुद्रा लोनही देण्यात येत आहे तेव्हा महिलानी पुढे येण्याची गरज आहे.
या कार्यक्रमासाठी सिडकोचे चौटाला, कळंबोली शहर अध्यक्ष रविशेठ पाटील, भीमशक्ती संघटनेचे अध्यक्ष सुभाष गायकवाड, रायगड जिल्हाध्यक्ष जिवन गायकवाड, आरपीयाचे रायगड जिल्हाध्यक्ष जगदीश गायकवाड, पनवेल महानगरपालिकेचे स्थायी समिती सभापती प्रविण पाटील, माजी स्थायी समिती सभापती अमर पाटील, नगरसेवक राजेंद्र शर्मा नगरसेविका प्रमिला पाटील, नगरसेविका विद्या गायकवाड, प्रभाग समिती अध्यक्ष संजय भोपी, नगरसेवक एकनाथ गायकवाड, आयपीआय शहर अध्यक्ष मोहनजी बलखंडे भाजपचे उपाध्यक्ष बबन बारगजे, राजूशेठ बनकर, नितीन काळे, प्रकाश शेलार, आदिसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

38 − = 35