व्यावसायिकांचा दर आठवड्याला दिवाळी व दसरा हा सण असतो – उद्योजक जे.एम.म्हात्रे
पनवेल/आदिवासी सम्राट :
व्यावसायिकांच्या आठवड्याच्या सरतेला म्हणजेच शनिवारी हा सर्वांना पेमेंट वाटण्याचा दिवस असतो त्यामुळे ती गोरगरीबांची दिवाळी असते. तर सोमवारपासून पुन्हा कामाला लागायचे असते. तो दसरा असतो. यामुळे व्यावसायिकांचा दर आठवड्याला दिवाळी आणि दसरा हा सण असतो.
आज पनवेल, उरण, खालापूर परिसरातील पत्रकार बांधवांबरोबर दिवाळी सण साजरा करताना एक विशेष आनंद होत असून जुन्या काळातील दिवस पुन्हा आठवणीत आल्याचे प्रतिपादन यशस्वी उद्योजक जे.एम.म्हात्रे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना केले. तर यावेळी प्रसिद्ध उद्योजक जे. एम. म्हात्रे, ज्येष्ठ नेते नारायण घरत, युवा नेते प्रितम म्हात्रे, मा.सरपंच जितेंद्र म्हात्रे, जेष्ठ पत्रकार माधव पाटील, ज्येष्ठ पत्रकार विजय कडू आदी उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना प्रितम म्हात्रे यांनी सांगितले की, समाजामध्ये घडणार्या सर्व प्रकारच्या घडामोडी शेवटच्या घटकापर्यंत येण्या पोहोचविसाठी 24 तास निस्वार्थीपणे काम करणारा पत्रकार हा खर्या अर्थाने लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे. नैसर्गिक आपत्ती असो किंवा कोणावर अन्याय होत असेल तर त्यावर पत्रकार आवाज उठतात. उरण, पनवेल रायगड जिल्ह्यासह नवीमुंबई मधील पत्रकार योग्यतेने काम करीत आहेत. पत्रकारांनी समजहितासाठी काम करून समाजात आदर्श निर्माण केला आहे. त्यामुळे पत्रकारांप्रती आदर प्रेम व बाळगत व एक कुटुंब म्हणून म्हात्रे कुटुंबातर्फे दिवाळी फराळ कार्यक्रमाचे आयोजन केल्याची माहिती त्यांनी दिली. कोपर येथील निवासस्थानी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पत्रकारांच्या वतीने ज्येष्ठ पत्रकार माधवराव पाटील व मंदार दोंदे यांनी आपल्या भावना व्यक्त करून म्हात्रे कुटुंबियांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.