20200512 112916
ताज्या नवी मुंबई पनवेल महाराष्ट्र सामाजिक

ऑलकार्गो कंपनी मार्फत मालडूंगे, वाजे भागातील ५ आदिवासी वाड्यांना दैनंदिनी वस्तूंचे वाटप

ऑलकार्गो कंपनी मार्फत मालडूंगे, वाजे भागातील ५ आदिवासी वाड्यांना दैनंदिनी वस्तूंचे वाटप

हौशाचीवाडी, लहान धामणी,मोठी धामणी, शिवणसई कातकरीवाडी, सांगटोली कातकरीवाडीचा समावेश

पनवेल/ प्रतिनिधी :
कोरोनाचा संकट असल्याने अनेकांना आर्थिक अडचणीला तोंड द्यावे लागत असून परिस्थिती देखील बिकट होतांना दिसत आहे. याचाच एक मद्दतीचा हातबोट म्हणून ऑलकार्गो कंपनीने पनवेल तालुक्यातील लहान धामणी, मोठी धामणी, हौशाचीवाडी, शिवणसई कातकरीवाडी, सांगटोली कातकरवाडी या पाच आदिवासी वाड्यांमध्ये कंपनीचे कार्यकारी डायरेक्ट आर्थिक साहीकिरण शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली तांदूळ, डाळ, चना, कांदे, बटाटे, वाटणा, तेल, मसला इ. दैनंदिनी वस्तूंचा वाटप साधारणतः ४२० कुटुंबांना करण्यात आले.
यावेळी ऑलकार्गो कंपनीचे सी. एस. आर. मॅनेजर नितीन कांबळे, सावली संस्थेचे अध्यक्ष विजय घोलप, सेक्रेटरी शांताराम माने, सरपंच अनुराधा वाघमारे, माजी सरपंच मैनाबाई भगत, मालडूंगे ग्रामपंचायतचे सदस्य जनार्दन निरगुडा, सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ चौधरी, काळूराम वाघ, संजय चौधरी, राम भस्मा, गणेश शिद, गणेश साहू, धर्मा पारधी, अरूणा पाडवी आदी. उपस्थित होते.

2 thoughts on “ऑलकार्गो कंपनी मार्फत मालडूंगे, वाजे भागातील ५ आदिवासी वाड्यांना दैनंदिनी वस्तूंचे वाटप

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

13 + = 15