मुख्यमंत्री यांच्या निवासस्थानी आदिवासी बांधव ५ मार्चला करणार आत्मदहन..
करोडो रुपयांचा शासनाचा महसूल बुडवणे व आदिवासीच्या नागरी सुविधांवर अडचणी करत असल्याने बेकायदेशीर दगडखाणी बंद करण्यासाठी आदिवासी बांधव एकवटले..
पनवेल/ आदिवासी सम्राट :
पनवेल शहराच्या हक्काच्या अंतरावर राहणाऱ्या आदिवासीचे या बेकायदेशीर दगडखाणीमुळे जगणे अवघड झाले आहे. या बेकायदेशीर दगडखाणीमुळे सरकारचा करोडो रुपयांचा महसूल बुडवला आहे. या शासनाचा महसूल बुडवणे आणि बेकायदेशीर दगडखाणी चालवण्यात शासकीय अधिकाऱ्यांचा हात असल्याचे बोलले जाते. विविध शासकीय कार्यालयात अनेकदा तक्रारी अर्ज केले. मात्र, बेकायदेशीर दगडखाणी बंद झाल्या नाहीत. उलट आदिवासीच्या नगरी सुविधावर अडचणी होत गेल्या आहेत.
या बेकायदेशीर दगडखाणी बंद करा, नाहीतर ५ मार्च ला मुख्यमंत्री निवास व मंत्रालया समोर सर्व आदिवासी आत्मदहन करणार असल्याचे २ महिन्यापूर्वी पनवेल येथील मंडळ अधिकारी, तहसीलदार, प्रांत अधिकारी, सिडको अतिक्रमण अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण कंट्रोल बोर्ड अधिकारी, जिल्हाधिकारी रायगड विभागीय अधिकारी यांना पत्र दिले होते. मात्र वरील शासकीय अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षमुळे शासनाचा करोडो रुपयांचा महसूल बुडवला जात आहे. शिवाय, याच अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने बेकायदेशीर दगडखाणी चालू आहे. त्यामुळे आदिवासीच्या नगरी सुविधावर अडचणी निर्माण झाल्या आहेत.
आदिवासी बांधवाना शासकीय अधिकाऱ्यांकडून अद्यापही न्याय मिळालेल नाही. म्हणूनच ५ मार्चला वर्षा बंगला मुख्यमंत्री निवासस्थान व मंत्रालयसमोर वाघऱ्याचीवाडी, टेंभोडे, सागवाडी व वळवलीमधील शेकडो आदिवासी बांधव आपल्या कुटुंबासमवेत राहते गाव सोडून मुंबईला पायी जाण्याचा येथील आदिवासी बांधवानी घेऊन त्या ठिकाणी आत्मदहन करणार असल्याचे सौ. जोमी दामू गिरा हिने सांगितले आहे.