74 हजारांची फसवणूक..
पनवेल/ आदिवासी सम्राट :
मोबाईल हॅक करून क्रेडिट कार्ड मधून 74 हजार 41 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी कळंबोली पोलीस ठाण्यात अनोळखी ईसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
सेक्टर 16, रोडपाली येथे राहणारे राकेश महादेव जाधव यांना मोबाईल मध्ये सकाळी साडेसहा ते साडेनऊ वाजेपर्यंत सहा एसएमएस आले होते. व त्याद्वारे एकूण 74 हजार ४१ रुपये क्रेडिट कार्ड वरून डिलीट झाले असल्याचे त्यांना आढळून आले. यावेळी मोबाईलच्या स्क्रीनवर पाहिले असता येणारे सर्व मेसेज ऑटोमॅटिक अन्य दोन मोबाईल क्रमांकावर जात होते. यावेळी मोबाईल कोणीतरी हॅक केल्याची त्यांना खात्री झाली. त्यांनी ताबडतोब एसबीआय कस्टमर केअर कडे संपर्क साधला. त्यानंतर सायबर क्राईम पोलीस ठाण्याला संपर्क साधून मोबाईल फॉरमॅट केला. फसवणूक झाल्याप्रकरणी अनोळखी ईसमा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
kraken ссылка зеркало официальный