Img 20250327 Wa0029
कोकण नवी मुंबई पनवेल महाराष्ट्र सामाजिक

आमदार विक्रांत पाटील यांनी घेतली सिडको नैना प्रकल्प विषयी महत्वपूर्ण बैठक

Adivasi Samrat Logo New Websiteआमदार विक्रांत पाटील यांनी घेतली सिडको नैना प्रकल्प विषयी महत्वपूर्ण बैठक

पनवेल/ प्रतिनिधी :
आ. विक्रांत दादा पाटील यांनी नैना प्रकल्प व त्यातील अडचणी संदर्भात विधान भवनात लक्षवेधी मांडून सरकारचे लक्ष वेधून घेतल्यानंतर या विषयाची तातडीने विशेष बैठक लावण्याची मागणी केली होती. त्यानुसार पनवेल उरण मधील ग्रामस्थ व शेतकऱ्यांचे गंभीर प्रश्न घेऊन नगरविकास राज्य मंत्री श्रीमती माधुरीताई मिसाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत सिडको प्रशासनाची एक महत्वपूर्ण बैठक आज सिडको निर्मल भवन मुंबई येथे संपन्न झाली.
Img 20250327 Wa0015या बैठकी दरम्यान ग्रामस्थ व शेतकऱ्यांच्या बाधित घरांना नियमित करणे, शेतकऱ्यांच्या मूळ घरावर आरेखित केले गेलेले इतर शेतकऱ्यांचे ४०% प्लॉट तथा शेतकऱ्यांच्या घरांवर टाकली गेलेली गार्डन, ओपन स्पेसेस व इतर आरक्षणे या बाबत आरक्षण इतरत्र हलवण्यासंदर्भात बदल करून तातडीने निर्णय करणे, गावठाण लगतच्या बांधकामांना नियमित करण्यासाठी UDCPR मधील कनजेस्टेड एरिया साठीच्या तरतूदी लागू करणे, पुनर्विकासाकरिता वाढीव FSI देणे, रस्त्यात बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांच्या बांधकामांना योग्य मोबदला, पुनर्वसन या बाबत सकारात्मक निर्णय करणे, शेतकरी व ग्रामस्थानची योग्य पध्दतीने संवाद साधून त्यांच्या शंकांचे निरसन करणे व अडचणी दूर करणे. या सर्व व इतर अति महत्त्वाच्या विषयांवर विस्तृत चर्चा झाली.
Img 20250327 Wa0016सिडको प्रशासनाने प्रश्न सोडविण्यासंदर्भात मंत्री महोदयांसमोर सकारात्मक भूमिका घेतली. येणाऱ्या कालावधी मध्ये हे सर्व प्रश्न सुटण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न व पाठपुरावा करण्यासाठी आम्ही काटीबद्ध असल्याचे आ. विक्रांत दादा पाटील यांनी सांगितले.
या बैठकीस मा. कोकण म्हाडा सभापती श्री. बाळासाहेब जी पाटील, सिडको व्यवस्थापकीय संचालक श्री. विजय जी सिंगल, JMD शंतनू जी गोयल, JMD गणेश जी देशमुख,मुख्य लँड सर्वे ऑफिसर समाधान खटकाळे, मुख्य नियोजन अधिकारी श्री. मानकर,अतिरिक्त नियोजन अधिकारी डॉ प्रिया,मंत्री महोदयांचे स्वीय सहाय्यक डॉ प्रशांत जी रसाळ यांच्यासह सिडकोचे सर्वच प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

Adivasi Calender 2025 Png