20190919 223915
ताज्या नवी मुंबई पनवेल महाराष्ट्र राजकीय रायगड

पनवेल तालुक्यातील ग्रामिण भागात विकासकामांसाठी १९ कोटी

पनवेल तालुक्यातील ग्रामिण भागात विकासकामांसाठी १९ कोटी

आमदार प्रशांत ठाकूर यांचा पाठपुरावा

————————————
आमदार प्रशांत ठाकूर यांनी शहरांबरोबरच गावांचा विकास झाला पाहिजे, यासाठी सातत्याने शासनाकडून निधी आणला आहे. त्यांनी कधीही विकासात राजकारण आणले नाही म्हणूनच त्यांच्याकडून सातत्याने विधायक कार्य घडत आहे. ग्रामीण भागाच्या विकासासाठी साडेसात कोटी रुपयांच्या कामांना प्रशासकीय मंजुरी झाली. त्यानुसार पायाभूत सुविधांच्या कामांना लवकरच सुरुवात होईल. ग्रामिण भागाच्या विकासासाठी निधी मंजूर करून घेतल्याबद्दल आमदार प्रशांत ठाकूर यांचे आभार.
– अरुणशेठ भगत
पनवेल तालुकाध्यक्ष, भाजपा
—————————————

पनवेल/ प्रतिनिधी :
आमदार प्रशांत ठाकूर यांनी केलेल्या मागणी व पाठपुराव्यानुसार ग्रामिण भागातील विकासकामांना प्रशासकीय मान्यता मिळाली असून तब्बल १९ कोटी रुपयांची आणखी विकासकामे होणार आहेत.
सामाजिक जाणिव व दूरदृष्टी असलेले आमदार प्रशांत ठाकूर यांनी प्रत्येक गावात विकास पोहोचविण्याचे काम केले आहे. त्या अनुषंगाने आमदार प्रशांत ठाकूर यांच्या आमदार स्थानिक विकास कार्यक्रम निधीतून वरची करंबेळी गावात अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण करणे (१० लाख रुपये), खैरवाडी गावात अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण करणे (१० लाख रुपये), चिंचवली तर्फे तळोजे गावात अंगणवाडी बांधणे (०८ लाख रुपये), शांतीवन येथे रस्ता काँक्रीटीकरण करणे (१० लाख रुपये), शिरवली गावात  रस्ता काँक्रीटीकरण करणे (१० लाख रुपये), भल्याचीवाडी गावात अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण करणे (१० लाख रुपये), विहिघर  गावात अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण करणे (१० लाख रुपये), कोप्रोली गावात अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण करणे (१० लाख रुपये), ग्रामपंचायत दूंदरे मधील चिंचवली  गावात अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण करणे (१० लाख रुपये), शिवणसई वाडी रस्ता काँक्रीटीकरण करणे (१० लाख रुपये) ग्रामपंचायत शिरवली  मधील चिंचवली  गावात अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण करणे (१० लाख रुपये), पालीदेवद गावात लहान मुलांचे दफनभूमी बांधणे व सुशोभिकरण करणे (०८ लाख), ग्रामपंचायत वांगणी तर्फे वाजे अंतर्गत मोहो गावात पेव्हर ब्लॉक बसविणे (१० लाख रुपये), वांगणी गावात रस्ता काँक्रीटीकरण करणे (१० लाख रुपये), सांगडे गावात अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण करणे (१० लाख रुपये), वारदोली ग्रामपंचायत अंतर्गत बेलवली गावात अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण करणे (१० लाख रुपये), नितळस येथे सामाजिक सभागृह बांधणे (०८ लाख रुपये), तसेच आमदार प्रशांत ठाकूर यांनी केलेल्या मागणी व पाठपुराव्यानुसार २५१५ अंतर्गत नेरेफाटा ते नेरेपाडा रस्ता करणे (२० लाख रुपये), शिवकर ते बोनशेत मधील रस्ता करणे (२० लाख रुपये), शिवणसई ते गाढेश्वर फाट्यापर्यंत रस्ता करणे (२० लाख रुपये), रिटघर ते आपटा फाटा (खानाव) रस्ता करणे (२० लाख रुपये), वलप फाटा ते हेदुटणे रस्ता करणे (२५ लाख रुपये), धामणी खालची ते गावाच्या विहिरीपर्यंत रस्ता करणे(२० लाख रुपये), पालेखुर्द ते चिंध्रण शंकर मंदिरापर्यंत रस्ता करणे(१५ लाख रुपये), मुख्य रस्ता ते हरिग्राम गावापर्यंत रस्ता करणे(१५ लाख रुपये), ग्रामपंचायत पालीदेवद अंतर्गत साक्षी पार्क टाईप ४ ते गणेश भावनापर्यंत पेव्हर ब्लॉक बसविणे (१५ लाख रुपये), ग्राम पंचायत शिरवली अंतर्गत चिंचवली आंबा रस्ता करणे(१५ लाख रुपये), ग्राम पंचायत शिरवली अंतर्गत चिंचवली आंबा गावात स्मशानभूमी रस्ता काँक्रीटीकरण करून स्मशानभूमी सुशोभिकरण करणे (१५ लाख रुपये), टेंभोडे फाटा ते नेवाळी गावापर्यंत रस्ता करणे (१५ लाख रुपये), कोळवाडी हायस्कुल ते कोळवाडी गावापर्यंत रस्ता करणे(२० लाख रुपये), ओवळे याई मंदिर ते कुंडेवहाळ गावापर्यंत रस्ता करणे(२० लाख रुपये), ग्रामपंचायत पालीदेवद मधील शिलोत्तर रायचूर अंतर्गत रस्ता काँक्रटीकरण करणे(२० लाख रुपये), करवेली स्मशानभूमी रस्ता काँक्रीटीकरण करणे व स्मशानभूमीजवळ शेड बांधणे (१५ लाख रुपये), ग्रामपंचायत पालीदेवद अंतर्गत प्रेरणा सोसायटी ते गणेश मंदिर रस्ता काँक्रीटीकरण करणे (२० लाख रुपये), विचुंबे ग्रामपंचायत कार्यालय ते शिवम कॉम्प्लेक्सपर्यंत  रस्ता काँक्रीटीकरण करणे (२० लाख रुपये), ग्रामपंचायत् कसळखंड अंतर्गत अरिवली गावात  रस्ता काँक्रीटीकरण करणे (१० लाख रुपये), ग्रामपंचायत भिंगार अंतर्गत भिंगारवाडी येथे सामाजिक सभागृह बांधणे (१२ लाख रुपये), ग्रामपंचायत दिघाटी अंतर्गत दिघाटी गावात  रस्ता काँक्रीटीकरण करणे (२० लाख रुपये), विचुंबे ग्रामपंचायत अंतर्गत माऊली सोसायटी येथे   रस्ता काँक्रीटीकरण करणे (१५ लाख रुपये), ग्रामपंचायत शिरवली अंतर्गत आंबा चिंचवली गावामध्ये रस्ता करणे( १५ लाख रुपये), शिरवली ते कोंडप रस्ता करणे (२० लाख रुपये), महोदर गावामध्ये रस्ता काँक्रीटीकरण करणे (१५ लाख रुपये), ग्रामपंचायत शिरवली अंतर्गत कुत्तरपाडा गावात रस्ता काँक्रीटीकरण करून गटार बांधकाम करणे (०८ लाख रुपये), वारदोली फाटा ते वारदोली गावापर्यंत रस्ता काँक्रीटीकरण करणे (२५ लाख रुपये), उसर्ली पूल ते उसर्ली गावदेवी मंदिरापर्यत रस्ता करणे (३० लाख रुपये ), हेदुटणे चांदणेवाडी येथे रस्ता बनविणे (१० लाख रुपये), खेरणे येथे गावापर्यंत रस्ता काँक्रीटीकरण करणे  (१० लाख रुपये), फणसवाडी येथे रस्ता काँक्रीटीकरण करणे (१० लाख रुपये ), पालेखुर्द ते वावंजे रस्ता डांबरीकरण करणे (१५ लाख रुपये), तामसई गावात समाजमंदिर बांधणे(१० लाख रुपये), चिंचवली रस्ता काँक्रीटीकरण व गटार करणे (१० लाख रुपये ), खैरवाडी बॉंडारपाडा येथे सामाजिक सभागृह बांधणे (१० लाख रुपये), हरिग्राम करवली ठाकूरवाडी अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण करणे (१० लाख रुपये), वाकडी ते स्टॉप देवी मंदिरापर्यंत रस्ता बनविणे(१० लाख रुपये), गाढेश्वर गावात सामाजिक सभागृह बांधणे(१० लाख रुपये), मालडुंगे गावात श्री मूर्ती विसर्जन घाट बांधणे(१० लाख रुपये), धामणी अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण व पेव्हर ब्लॉक बसविणे (२० लाख रुपये), नेरे स्मशानभूमी येथे सुशोभिकरण व शेड बांधणे (१० लाख रुपये), उमरोली ग्रामपंचायत अंतर्गत उसर्ली गावात रस्ता काँक्रीटीकरण करणे (१० लाख रुपये), चिपळे गावातील मालडुंगे मुख्य रस्ता ते चिपलाई गावदेवी मंदिरापर्यंत रस्ता काँक्रीटीकरण करणे (१० लाख रुपये), भोकरपाडा मुख्य रस्ता ते भोकरपाडा गावापर्यंत रस्ता डांबरीकरण करणे (१५ लाख रुपये) अशा साडेआठ कोटी रुपयांच्या विकासकामांना प्रशासकीय मान्यता मिळाली असून लवकरच या कामांना सुरुवात होणार आहे.
त्याचबरोबर मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून पनवेल तालुक्यातील पोयंजे ते पोयंजे कातकरवाडी पाली बुद्रुक, पोसरी ठाकूरवाडी, चिरवत सांगुर्ली, धामणी ठाकूरवाडी, कोंडले ते खैरवाडी गारमाळ, डोलघर, कल्हे, चिखले, गिरवले, अवलिचा पाडा, धामणी ते हौशाची वाडी येथील रस्त्यांना एकूण १० कोटी ८० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून या कामांनाही लवकरच सुरुवात होणार आहे.