20191105_094921
ठाणे ताज्या नवी मुंबई नेरळ महाराष्ट्र मुरबाड रायगड सामाजिक

डोंबारी समाज आजही पिढ्यानपिढ्या कलेत पारंगत, शिक्षणापासून वंचितच…

डोंबारी समाज आजही पिढ्यानपिढ्या कलेत पारंगत

  • वर्षातील 12 महिन्या पैकी 9 महिने पोटासाठी गाव भटकंतीच
  • शिक्षणापासून वंचितच

माथेरान/ प्रतिनिधी :
आपल्या राज्यातून परराज्यात जाऊन पोटाची खळगी भरण्यासाठी अनेक समाज आजही दूरदूर जाऊन आपल्या कला सादर करून चिमुरड्या लेकरांना सोबत घेऊन पायपीट करताना दिसत आहेत.
त्यातच नट समाज्यातील पिढ्यानपिढ्या आपली कला जनतेसमोर सादर करीत असतात आपण त्यांना डोबारी समाज मानतो पण त्याचातही विविध जाती आहेत त्या पैकी नट समाज.
चार ते पाच वर्षांच्या लहानग्या लेकरांना उपजत शिकवण अंगीकृत असतेच. यामध्ये ढोपराणे रस्सीवर सरकत जाणे पायाखाली ताटली घेत रस्सी वर चालणे, सायकल रिंग पायाखाली घेऊन रस्सी पार करणे असे विविध प्रकारचे खेळ लहान मुले मुली तसेच १२ ते १५ वर्षांच्या मुली यात सहभागी असतात. हे खेळ ते करत असले तरी आपणाला त्याच्याकडे बघताना काळजाचा ठोका पडत असतो, पण ते मात्र तो खेळ अगदी सहज हसत हसत करत असतात, बऱ्याच वर्षांनी माथेरान मध्ये डोंबारी लोकांचे आगमन झाले असून त्यांच्या या विविध कला पाहून पर्यटक देखील अचंबित होत आहेत.
छत्तीसगड येथून आलेले हे डोंबारी सध्या पनवेल येथे रहात आहेत. वर्षातून फक्त तीन महिने अर्थातच होळीच्या मुख्य सणापूर्वी हा समाज आपल्या मूळ गावी तीन महिन्यांसाठी जातो पुन्हा नऊ महिने हे लोक आपल्या राज्याबाहेरील गावात जाऊन पोटाची खळगी भरण्यासाठी दूरदूर जात असतात. यातील काहींची मुले शिक्षण घेत आहेत तर काहींनी या व्यवसायाला आपले सर्वस्व मानले आहे त्यामुळे प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत पिढ्यानपिढ्या याच खेळांवर ते आपली उपजीविका भागवत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

− 3 = 1