शिवसेनेबरोबर बरोबर युती करणार नाही – आ. नरेंद्र मेहता
भाईंदर/ प्रतिनिधी :
मीरा भाईंदर महानगरपालिकेत शिवसेनेने स्थायी समिती सभागृह व महापौर दालनाची तोडफोड केली. तोडफोड केल्यामुळे आमदार नरेंद्र मेहता यांनी शिवसेनेबरोबर युती करणार नाही, असे सांगितले आहे .
शिवसेना निवडून येते की फक्त भाजप व मोदीजी मुळे निवडून येते. आज जी घटना घडली आहे ती अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. महिला महापौर यांच्या केबिनमध्ये जाऊन शिवीगाळी केली व कार्यालयाची तोडफोड केली आहे. मारामारी करणे, आई बहिणीवर शिवीगाळी करणे अत्यंत निंदनीय आहे. तेही महिला महापौर यांच्या केबिनमध्ये जाऊन तोडफोड करून शिवीगाळ करणे म्हणजे अत्यंत शरमेची गोष्ट आहे. शिवसेनेने तोडफोड करून जनतेच्या पैशाचे नुकसान केले आहे. यासाठी जनतेचे पैसे वापरले आहेत. ते काही तुमच्या घरचे नाहीत हे त्यांना भरावे लागतील. त्यांना याचे उत्तर येणाऱ्या महासभेत दिले जाईल. नागरिकही त्यांना उत्तर देतील. एकीकडे महिलेच्या सन्मानाची गोष्ट करतात आणि दुसरीकडे महिलांचा अपमान करतात. कलादालनाचा ठराव करण्यात आला आहे तो ठराव भाजपनेच आणला आहे परंतु त्यासाठी आर्थिक बजेट पाहिजे ते महापालिकेकडे नाही. यासाठी दोन करोड रुपये महापालिका व ते २३ करोड रुपये महाराष्ट्र शासन देणार आहे.
प्रताप सरनाईक यांनी गेल्या पाच वर्षात एकही रुपया या कामासाठी आणला नाही आणि वरून बोलतात बजेट करा पैसे येतील पैसे कुठून येणार ? बजेटमध्ये मान्यता मिळाली नाही तरी निवडणूक आहे म्हणून उद्घाटन करायचे हे चुकीचे आहे. स्वर्गीय प्रमोद महाजन यांचे स्मारक आहे त्याचबरोबर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक आहे. तेव्हा ठराव आम्हीच केलेला असल्यामुळे आम्हाला हि त्याची चिंता आहे. परंतु त्यासाठी बजेट नाही या दोन्ही कलादालनासाठी ४८ करोड महाराष्ट्र शासन देणार आहे.
आ. प्रताप सरनाईक गेल्या पाच वर्षापासून प्रयत्न करत आहेत. परंतु, एक रुपया मिळाला नाही आणि इकडे येऊन जबरदस्तीने विषय घ्या सांगतात. निवडणुका आहेत पण तुमच्या निवडणुकांमुळे काय जनतेचा बळी देणार का? असा प्रश्न आमदार नरेंद्र मेहता यांनी केला आहे. आता जनतेची वेळ आली आहे की त्यांना उत्तर द्या आम्ही तर वेळोवेळी त्यांना उत्तर दिले आहे. मी मुख्यमंत्री व वरिष्ठ नेत्यांशी बोलून घडलेला प्रकार निंदनीय आहे. हे सहन केले जाणार नाही. त्यांची जर अशीच वर्तणूक राहिली व आमदार प्रताप सरनाईक व त्यांच्या नगरसेवकांनी सभागृहात येऊन माफी मागितली नाही. तर त्यांच्याबरोबर युती करणार नाही, असे आमदार मेहता यांनी सांगितले. मी माझ्या स्वार्थासाठी नाही तर जनतेचे बळी देऊन, महिलेचा अपमान करून, जनतेचे नुकसान करून अशी युती आयुष्यात करणार नाही असे मेहता यांनी सांगितले.
तसेच महापौर यांनीही घडलेली घटना ही निंदनीय आहे. त्यांनी कार्यालयाची तोडफोड करून शिवीगाळी केली त्यामुळे महिलेचा अपमान केला आहे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे महापौर डिंपल मेहता यांनी सांगितले.