‘प्लास्टिक हटाव, पर्यावरण बचाव’ चा संदेश दिला जनतेला…
नेरळ/ प्रतिनिधी :
विद्या विकास मंदिर नेरळ शाळेच्या विद्यार्थ्यांनी प्लास्टिक बंदी रॅलीचे आयोजन करून नेरळ शहरात प्लास्टिक बंदी करण्याबाबत जनजागृती करण्यात आली.
शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. निकम मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षकांच्या साहाय्याने इयत्ता आठवी ते दहावीपर्यंतच्या सुमारे अडीचशे विद्यार्थ्यांनी प्लास्टिक बंदी जनजागृती रॅली काढून प्लास्टिक मुळे होणारे नुकसान पर्यावरणाचे होणारे आणि याबाबत जनजागृती करत ‘प्लास्टिक हटाव, पर्यावरण बचाव’ या सारखे संदेश जनतेपर्यंत पोचवण्याचे काम या रॅलीच्या माध्यमातून करण्यात आले.
प्लास्टिक बंदीची रॅली सकाळी 9 वा. विद्या विकास मंदिर नेरळ ते जुने बाजारपेठ – शिवाजी चौक मुख्य बाजारपेठ या मार्गाने करण्यात आले होते. सदर रॅलीमध्ये प्लास्टिक बंदी बाबतच या वेगवेगळ्या घोषणा देत स्वच्छतेबाबत विद्यार्थ्यांनी सुंदर गीत – गायन तर प्लास्टिक हटाव या गीतावर नृत्य केले. त्याच बरोबर कु. गिरिष ऐनकर या विद्यार्थ्याने प्लास्टिक नावाचा महासुर आपल्या भूमातेवर कसे आक्रमण करतोय. हे आपल्या वक्तृत्वातून पटवून दिले तसेच ज्या – ज्या नागरिकांच्या हातात प्लास्टिकच्या पिशव्या होत्या, त्यांना – त्यांना कापडी पिशव्या विद्यार्थ्यांनी दिल्या.
या जनजागृती रॅलीमध्ये विद्यार्थी विद्या विकास मंडळाचे उपाध्यक्ष श्री बल जोशी, विद्या विकास मंडळाचे माजी अध्यक्ष श्री सुरेश दादा, सदस्य श्री साने सर, कोषाध्यक्ष श्री बदले काका उपस्थित होते. तसेच कर्जत पंचायत समिती विस्तार अधिकारी श्री अहिरे, नेरळ ग्रामपंचायत ग्रामविकास अधिकारी श्री संजय राठोड यांचाही सहभाग होता. या सर्वांचे स्वागत मुख्याध्यापिका सौ शैलजा निकम यांनी कापडी पिशवी देत स्वागत केले. रॅलीचे आयोजन मुख्याध्यापिका निकम मॅडम यांनी करून सर्व शिक्षक, कर्मचारी यांनी सुद्धा खुप मेहनत घेतली. या रॅलीचे शेवट प्लास्टिक बंदीची प्रतिज्ञा घेऊन करण्यात आली. तसेच सर्व उपस्थितांचे आभार सुद्धा करण्यात आले.