Img 20191011 Wa0012
उरण नवी मुंबई मुंबई रायगड सामाजिक

नवरात्रोत्सवा दरम्यान घेण्यात आलेल्या सर्वोत्कृष्ठ मंडळांना पारितोषिक देऊन करण्यात आले सन्मानित ! साई देवस्थान वहाळचा स्थूत्य उपक्रम

नवरात्रोत्सवा दरम्यान घेण्यात आलेल्या सर्वोत्कृष्ठ मंडळांना पारितोषिक देऊन करण्यात आले सन्मानित !

साई देवस्थान वहाळचा स्थूत्य उपक्रम

पनवेल/ प्रतिनिधी :
श्री साई देवस्थान वहाळ तर्फे तालुक्यातील वहाळ येथे नवरात्रोत्सवा दरम्यान घेण्यात आलेल्या सर्वोत्कृष्ठ मंडळांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले आहे. यात प्रथम क्रमांक- व्यापारी मित्र मंडळ, से.२ उलवे, द्वितीय क्रमांक- शिव प्रतिष्ठान, से.१९, उलवे व तृतीय क्रमांक एस.ए. ग्रुप, उलवे यांना देण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन देवस्थानचे प्रमुख रविशेठ पाटील, राजू मुंबईकर, आणि मढवी गुरुजी यांनी केले होते.
उलवे न्युज यांच्या वतीने नवरात्रोत्सवा दरम्यान घेण्यात आलेल्या सर्वोत्कृष्ठ मंडळ या स्पर्धेतील प्रथम तीन विजेत्यांना साई देवस्थान येथे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी मंडळाचे सभासद उपस्थीत होते. उलवे गावातील एक तरुण व्यक्तीमत्व किरण मढवी यांनी विविध सामाजिक, क्रीडा, सांस्कृतिक कार्यक्रम समाजात राबविले असून ३१ मुलींना दत्तक घेऊन त्यांच्या शिक्षणाचा सर्व खर्च त्यांनी उचलल्याबद्दल साई देवस्थान, साईनगर, वहाळ यांच्या वतीने त्यांचा देखील सन्मान करण्यात आला.यावेळी पनवेलमधील निलेश सोनवणे- (पनवेल युवा), संजय कदम- (दै.सामना), सय्यद अकबर- (कोकण डायरी), मयूर तांबडे- (दै. लोकमत), साहिल रेळेकर- (ए एम न्युज), रवींद्र गायकवाड- (दै. पुढारी), गणपत वारगडा- (आदिवासी सम्राट), संतोष वाव्हळ -( तरुण भारत), सनिप कलोते- (क्षितिज पर्व), विकास पाटील- (शिवतेज) असे विविध नामांकित पत्रकारांनी श्री साई देवस्थान, साईनगर, वहाळला सदिच्छा भेट दिली. यावेळी देवस्थानच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

− 4 = 6