Img 20200102 Wa0049
ठाणे ताज्या महाराष्ट्र रत्नागिरी रायगड सामाजिक

वीटभट्टी मालकाच्या वेठबिगारी पाशात असलेल्या आदिवासी मजुराच्या मृत्यूनंतरही गुन्हा दाखल करण्यास पोलीसांनी दिला होता नकार; संघटनेने काढला पोलिसांविरोधात मोर्चा…

वीटभट्टी मालकाच्या वेठबिगारी पाशात असलेल्या आदिवासी मजुराच्या मृत्यूनंतरही गुन्हा दाखल करण्यास पोलीसांनी दिला होता नकार; संघटनेने काढला पोलिसांविरोधात मोर्चा

गुन्हा दाखल केल्यानंतर संघटनेकडून केला पोलिसांचा सन्मान


रसायनी/ प्रतिनिधी :
रसायनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विनोद अंकुश वाघमारे हा मजूर खंडू माळी या वीटभट्टी मालकाने वेठबिगारी पाशात होता. विनोद याचा मालकाच्या मारहाणीनंतर संशयास्पद मृत्यू झाला. याबाबत विनोदची पत्नी सोनी याबाबत तक्रार देऊनही पोलिसांनी तक्रार घेतली नव्हती. याबाबत संतप्त श्रमजीवी संघटनेने रसायनी पोलीस ठाण्यावर मोर्चा आयोजित केला. सीआरपीसी च्या कलम 154 प्रमाणे आलेली फिर्याद असेल तशी दाखल करणे पोलिसांना बंधनकारक असताना तसे होत नसेल तर “तुमचा कायदा तुम्ही आम्हाला शिकवा” अशी मागणी श्रमजीवीने केली होती. पोलीस निरीक्षकांनी याबाबत गुन्हा दाखल केल्यामुळे मोर्चाचे रूपांतर मिरवणुकीत करत श्रमजीवी कडून पोलिसांचा सन्मान करण्यात आला.

या पोलीस स्टेशनवर काढलेला मोर्चा नियोजित होता, मात्र पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांनीही गुन्हा दाखल करण्याबाबत सकारात्मक तयारी दाखवली होती, तर रजेवर असलेल्या पोलीस निरीक्षक सुजाता तानवडे यांनी श्री. पंडित यांना संपर्क करून कायदेशीर दृष्टीने फिर्याद योग्य असून गुन्हा दाखल करण्याची तयारी दाखवत पोलिसांनी अखेर गुन्हा दाखल केल्याने संघटनेचा मोर्चाचे रूपांतर मिरवणुकीत झाले. विवेक पंडित हे स्वतः या मिरवणुकीत उपस्थित राहून रायगड पोलिस अधीक्षक आणि रसायनीच्या पोलीस निरीक्षक यांचे स्वतः कौतुक केले व मयत विनोद च्या कुटुंबियांच्या हस्ते पोलिसांचा सन्मान केला. या गुन्ह्यात नकारात्मक भूमिका घेणाऱ्या पोलीस उपअधीक्षक यांना कायद्यानं वागण्याचा सूचक इशारा पंडित यांनी दिला.

तसेच कोणत्याही मालकाने कोणत्याही मजुराला बयाना देऊन आगाऊ बंधनात बांधून घेऊ नये, हीच पद्धत कायद्याने गुन्हा ठरवली आहे, जर असे करून कुणाला कामावर ठेवले तर त्या मालकाविरोधात कायदेशीर कारवाई केल्याशिवाय संघटना शांत राहणार नाही असा इशारा पंडित यांनी दिला आहे. यावेळी संघटनेचे संस्थापक तथा राज्यस्तरीय आदिवासी क्षेत्र आढावा समिती अध्यक्ष विवेक पंडित, सरचिटणीस बाळाराम भोईर, जिल्हा अध्यक्ष हिरामण नाईक, संजय गुरव, दशरथ भालके, राजेश चन्ने, योगिता दुर्गे, गणपत हिलम, मोतीराम नामकुडा, तसेच इतर राज्य जिल्हा तालुका पदाधिकारी उपस्थित होते. भव्य मिरवणुकीत मोठ्या प्रमाणात जनसमुदाय उपस्थित होता.