20220723_162039
ठाणे ताज्या पिंपरी मुंबई सामाजिक

ग्रामसेवकाची धडाकेबाज कारवाई ; दहिसर ठाकूरपाड्यात केमिकल युक्त भट्या केल्या बंद

ग्रामसेवकाची धडाकेबाज कारवाई ; दहिसर ठाकूरपाड्यात केमिकल युक्त भट्या केल्या बंद

आदिवासी बांधवांना झाले आनंद ; माञ, राजकीय पुढा-यांचे धाबेच दणाणले…

“दहिसर ठाकूर पाड्यात घाणीचे साम्राज्य, पिंपरी ग्रामपंचायतीचे दूर्लक्ष” अशी बातमी देखील… दि.१४ मे २०२२ रोजी ADIVASI News & Entertainment YouTube Channel च्या माध्यमातून प्रकाशित केली होती व सातत्याने पाठपुरावा

कल्याण/ प्रतिनिधी :
पंचायत समिती कल्याण हद्दीतील पिंपरी ग्रामपंचायत येथील दहिसर ठाकूरपाडा परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या भंगार गोडाऊन, अनाधिकृत केमिकल भट्याचे साम्राज्य निर्माण झाले होते. त्यामुळे अनेक वर्षांपासून या भागात केमिकल या रासायनिक उपद्रव्यामुळे मानवी, जीव प्राणी विस्कळीत होऊन शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत होती. एवढंच निहीतर पिण्याच्या पाण्यापासून ते स्थानिक ग्रामस्थांना रोगराईचे सातत्याने संघर्ष करावा लागला होता. याबाबत ADIVASI News & Entertainment YouTube Channel च्या माध्यमातून दि. १४ मे २०२२ रोजी “दहिसर ठाकूर पाड्यात घाणीचे साम्राज्य, पिंपरी ग्रामपंचायतीचे दूर्लक्ष” अशी बातमी देखील प्रकाशित केली होती.
तसेच यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालय, पंचायत समिती, पोलिस स्टेशन, स्थानिक नेत्यांकडे धाव घेऊन लेखी निवेदन देखील दिले. परंतू, अनेक वर्षांपासून रखडलेल्या भंगार गोडाऊनला राजकीय पुढारी शह देण्याचे काम करत होते. माञ ग्रामस्थानी जिद्द सोडली नाही. पिंपरी ग्रामपंचायतीमध्ये सध्या प्रशासनान लागले असल्याने येथील ठाकूर पाडा स्थानिक ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन ग्रामसेवक यांना अर्ज करून तात्काळ कारवाई करावी अशी विनंती देखील केली. शिवाय, केमिकल युक्त असणा-या काही भठ्या निदर्शनास आणून दिल्या.

यावेळी पिंपरी ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक यांनी केमिकल युक्त आणि बेकायदेशीररित्या असणा-या भट्या शिळ करण्यात आल्या. त्यामुळे आता तरी आदिवासी बांधवांना चांगल्या प्रकारे आरोग्य व प्रदुषणमुक्त जगता येईल, असा विश्वास दाखवत या केलेल्या कारवाईवर आदिवासींनी ग्रामसेवकांसह अन्य अधिकारी यांचे आभार व्यक्त केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

+ 72 = 76